27.2 C
Mumbai
Tuesday, August 11, 2026
घरविशेषगडचिरोलीत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू, चौकशी होणार

गडचिरोलीत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू, चौकशी होणार

या धक्कादायक घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार

Google News Follow

Related

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू तर तीन विद्यार्थिनी जखमी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला.

या धक्कादायक घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक आणि नागपूरची पथके आज घटनास्थळी दाखल होऊन आश्रमशाळेची पाहणी करणार आहेत. विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था, सुरक्षेच्या उपाययोजना आणि व्यवस्थापनाकडून नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे.

हे ही वाचा:

रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक! विधानसभेला घेराव

जो खेलेगा, वो खिलेगा…पंतप्रधानांचा राष्ट्रकुल विजेत्यांशी संवाद

अजित पवारांच्या घटनेनंतर बारामतीत पुन्हा विमान अपघात

झारखंडमध्ये संघर्ष तीव्र; सीबीआय चौकशी हवीच!

सर्पदंशानंतर उपचार घेत असलेल्या आणखी तीन विद्यार्थिनींना तातडीने अँटी व्हेनम देण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे. चौकशीत निष्काळजीपणा किंवा सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळल्यास दोषी कोणताही असो, जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मुलींच्या मृत्यूवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे. अशी बातमी मलाही मिळालेली आहे. यासंदर्भात अधिकची माहिती मी मागवली आहे.”

नेमकं काय घडलं?

दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी असे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत. विद्यार्थिनी जेवणानंतर झोपलेले असताना रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. दरम्यान, इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी नैताम या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी सुरेश नैतम हिची प्रकृती गंभीर आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा