21 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरविशेषशिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा!

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा!

भारत-चीनच्या विशेष प्रतिनिधींच्या बैठकीत ६ मुद्द्यांवर सहमती

Google News Follow

Related

कैलास मानसरोवर यात्रेबाबत भारत आणि चीन यांच्यात एक करार झाला आहे. पाच वर्षांनंतर बीजिंगमध्ये दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींची बैठक झाली, ज्यामध्ये ६ मुद्द्यांवर सहमती झाली. या बैठकीत भारताच्या बाजूने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तर चीनच्या बाजूने परराष्ट्र मंत्री वांग यी उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सीमा वादावर सविस्तर चर्चा केली. ज्यामध्ये कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होईल यावर एकमत झाले.

कैलास मानसरोवर यात्रा ही एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे, जी हिंदू धर्माच्या अनुयायांसाठी विशेष महत्त्वाची आहे. हा प्रवास तिबेटमधील कैलास पर्वत आणि मानसरोवर सरोवरापर्यंत जातो. कैलास पर्वताला भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते. हा पर्वत तिबेटच्या पश्चिमेकडील हिमालय पर्वतश्रेणीचा एक भाग आहे, ज्याची उंची अंदाजे ६,६३८ मीटर आहे. तर मानसरोवर सरोवराची निर्मिती ब्रह्मदेवाने केली, अशी श्रद्धा आहे. हे सरोवर तिबेटच्या उंच पठारावर ४,५९० मीटर उंचीवर आहे आणि कैलास पर्वतापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे.

या प्रवासादरम्यान यात्रेकरू कैलास पर्वताची प्रदक्षिणा करतात आणि मानसरोवर तलावात स्नान करतात, जे पवित्र आणि मोक्षप्राप्तीचे साधन मानले जाते. हा प्रवास समुद्रसपाटीपासून १७,००० फूट उंचीवर असलेल्या लिपुलेख खिंडीतून होतो. कैलास मानसरोवर यात्रा जून महिन्यात सुरू होते, मात्र त्याची तयारी जानेवारीपासूनच सुरू होते. हा प्रवास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानला जातो, ज्यासाठी यात्रेकरूंकडून चांगली फिटनेस आवश्यक आहे.

हे ही वाचा : 

विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे, पदभार स्वीकारला!

आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ; सपा खासदार बर्क यांच्या घरावर वीज विभागाने छापा टाकताच वडिलांची धमकी

स्पीड बोटीतला माणूस प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन पडला आणि…

कुणीच लाईफ जॅकेट वापरले नाहीत, म्हणून…

दरम्यान, भारत आणि चीनने यात्रेसाठी सहमती दर्शविल्यामुले व्यापार आणि द्विपक्षीय संबंध मजबूत होतील असे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत म्हटले. ते म्हणाले, जय कैलास, जय मानस, भारत आणि चीन यांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत आणि चीन यांनी सीमापार नदी सहकार्यावरही सहमती दर्शवली आहे. नाथुला सीमेवरील व्यापार पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे द्विपक्षीय संबंध मजबूत होतील. भारत आणि चीन सीमापार सांस्कृतिक व सामाजिक आदानप्रदानावरही एकत्र काम करतील. हा उच्चस्तरीय बैठक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात पार पडला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा