27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषहरियाणाच्या मतदान तारखेत बदल, ५ ऑक्टोबरला होणार मतदान !

हरियाणाच्या मतदान तारखेत बदल, ५ ऑक्टोबरला होणार मतदान !

हरियाणा, जम्मू-काश्मीरची ४ ऐवजी ८ ऑक्टोबरला मतमोजणी

Google News Follow

Related

निवडणूक आयोगाने हरियाणा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. आता राज्यात १ ऑक्टोबरऐवजी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांतील मतमोजणीच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. दोन्ही राज्यांमध्ये आता ४ ऑक्टोबर ऐवजी ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने याबाबतचे निवेदन जारी केले आहे. हरियाणातील आगामी सण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बिष्णोई समाजाला देखील मतदान करता यावे तसेच परंपरा ही जपता आली पाहिजे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, जे गुरू जंबेश्वरांच्या स्मरणार्थ शतकानुशतके असोज अमावस्या सण साजरा करतात.

अखिल भारतीय बिश्नोई महासभा बिकानेर, राजस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख बदलण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती. पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील कुटुंबे गुरू जांभेश्वरांच्या स्मरणार्थ बिकानेरमध्ये वार्षिक उत्सवासाठी ‘असोज’ महिन्याच्या ‘अमावस्या’ला राजस्थानात मुकामी येतात. यावर्षी हा सण २ ऑक्टोबर रोजी असून सिरसा, फतेहाबाद आणि हिसार येथे राहणारे हजारो बिष्णोई कुटुंब या सणा दिवशी  राजस्थानला जाणार आहेत, ज्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

धैर्य, मिहिका, ध्रुव, अनिरुद्ध, आणि रिसा फर्नांडिसची निवड

आरे कॉलनीत बाईक विजेच्या खांबाला धडकली; तिघे मृत्युमुखी

तबेला मालकाच्या खिशात ड्रग्सचे पाकीट टाकताना पोलीस सापडले

अयय्या सुखू-सुखू…

भाजप आणि इंडियन नॅशनल लोक दल (INLD) यांनीही निवडणूक आयोगाकडे मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली होती. आठवड्याचा शेवटचा दिवस, सार्वजनिक सुट्ट्या आणि धार्मिक सणांमुळे निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची लेखी विनंती दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला केली होती. २९ आणि ३० सप्टेंबरला शनिवार आणि रविवारची सुटी असून, २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त पुन्हा सुट्टी असेल. अशा परिस्थितीत लोक सुट्ट्यांचा फायदा घेऊन बाहेर फिरायला जाऊ शतकतात. त्यामुळे मतदानावर त्याचा फटका बसू शकतो. दुसरीकडे काँग्रेस, जननायक जनता पक्ष (जेजेपी) आणि आम आदमी पार्टी यांनी निवडणुकीची तारीख बदलण्यास विरोध केला होता. या पक्षांनी सांगितले की, भाजपला पराभवाची भीती असल्याने तारीख बदलण्याची मागणी केली जात आहे.

हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने याआधी हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान घेण्याची घोषणा केली होती, तर ४ ऑक्टोबरला निकाल लागणार होता. यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या होत्या. इथेही ४ ऑक्टोबरलाच निकाल लागणार होता. मात्र आता निवडणूक आयोगाने या तारखा बदलल्या आहेत. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याआधी निवडणुका घेऊन निकाल जाहीर करायचा आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मागच्या वेळेस निवडणुका झाल्या होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा