25 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषपॅरालिम्पिक: भारतीय नेमबाजांची चमक कायम, रुबिनाने कांस्यपदक जिंकले !

पॅरालिम्पिक: भारतीय नेमबाजांची चमक कायम, रुबिनाने कांस्यपदक जिंकले !

भारताच्या खात्यात पाच पदके

Google News Follow

Related

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिसने कांस्यपदक जिंकून भारताला पाचवे पदक मिळवून दिले आहे. रुबिनाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. याआधी नेमबाजीत भारताला तीन पदके मिळाली होती, त्यामध्ये आता रुबिनाच्या पदकाची भर पडत ती चार झाली आहे. विशेष म्हणजे रुबिना ही ‘पिस्तुल स्पर्धेत’ पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरा-शूटिंग ऍथलीट ठरली आहे. रुबिनाने अंतिम फेरीत २११.१ गुण मिळवत कांस्यपदक जिंकले.

पॅरिस पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी देशासाठी पदकांची लयलूट करत जागतिक स्तरावर आपला दबदबा दाखवला. नेमबाज अवनी लेखराने हिने याची सुरुवात केली. अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH१ स्पर्धेत आपले विजेतेपद राखून पॅरालिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. याच स्पर्धेत नेमबाज मोना अग्रवालनेही चोख कामगिरी बजावत कांस्यपदकावर नाव कोरले. त्यानंतर भारतीय नेमबाज मनीष नरवालनेही पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल SH१ स्पर्धेत रौप्य पदक हासील केले. आता रुबिनाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत २११.१ गुण मिळवत कांस्यपदक जिंकले. यासह पॅरा ॲथलेट प्रीती पाल हिने महिलांच्या १०० मीटर ‘टी-३५’ स्पर्धेत १४.२१ सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदक जिंकले.

हे ही वाचा :

धैर्य, मिहिका, ध्रुव, अनिरुद्ध, आणि रिसा फर्नांडिसची निवड

आरे कॉलनीत बाईक विजेच्या खांबाला धडकली; तिघे मृत्युमुखी

तबेला मालकाच्या खिशात ड्रग्सचे पाकीट टाकताना पोलीस सापडले

टायगर मेमनच्या तीन सदनिका केंद्र सरकारच्या ताब्यात

रुबिना फ्रान्सिस कोण?

पॅरा नेमबाज रुबिना फ्रान्सिस ही मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असून तिने आपल्या खेळाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. तिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रुबिनाचे वडील सायमन फ्रान्सिस हे एक मेकॅनिक आहेत. २०१५ साली तिने आपल्या शुटींग प्रवासाला सुरुवात केली. यानंतर आतापर्यंत रुबिनाने नेमबाजीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आणि या काळात जागतिक विक्रमही केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा