35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषसध्याची कोरोना लाट १५ मेपर्यंत संपणार

सध्याची कोरोना लाट १५ मेपर्यंत संपणार

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा दावा

Google News Follow

Related

देशभरात तसेच राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरत असून १५ मे पर्यंत ती संपुष्टात येईल असा दावा केला असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येमध्ये १५ टक्के घाट झाली आहे. परिणामी राज्यात सध्या ५ हजार २३३ रुग्ण कोरोना बाधित आहेत.

राज्यातील एचपी १ व्ही ६ ही कोरोनाची लाट आता ओसरत आहे. १५ मी पर्यन्त ही लाट संपुष्टात येईल असा अंदाज कृती गटाने व्यक्त केला आहे. लाट संपुष्टात येत असली तरी नागरिकांनी कॉरोनपासून खबरदारी घ्यावी असे आवाहन मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

राज्यात शकोरोनाच्या ११०० रुग्णांची शनिवारपर्यंत १,१०० रुग्णांची नोंद झाली. पण आता हा आकडा ४६० च्या जवळ आला आहे.  २० ते २६ एप्रिल दरम्यान राज्यात ५ हजार २३३ कोरोना रुग्ण आढळले होते. १३ ते १९ एप्रिल दरम्यान ही संख्या ६ हजार १०२ आणि ६ ते १२ एप्रिल दरम्यान ५ हजार ४२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

दरम्यान देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४ हजार २८२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून, सोमवारी सकाळपर्यंत देशात केवळ ४७ हजार २४६ सक्रिय रुग्ण राहिले आहेत. एका दिवसात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे.

हे ही वाचा:

मद्यपी पोलिसांना हिमंता बिस्वसर्मांनी कायमचे घरी पाठवले

उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!

नेपाळवरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !

‘बारसूत रिफायनरीच्या जागेवर शेती नाही, घरे नाहीत, लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न नाही’

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात या कालावधीत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये केरळच्या बाजूने सहा मृत्यूंची भर पडली आहे. यासह, देशात महामारी सुरू झाल्यापासून एकूण मृतांची संख्या ५३१,५४७ वर पोहोचली आहे. भारतातील दैनंदिन संसर्ग दर सध्या ४.९२ टक्के आहे, तर साप्ताहिक संसर्ग दर ४ टक्के आहे. याआधी शनिवारी देशात संसर्गाची ५,८७४ प्रकरणे नोंदवली गेली होती, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४९,०१५ होती. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सक्रिय प्रकरणे संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी ०.११ टक्के आहेत, तर संसर्गातून बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.७१ टक्के आहे. आकडेवारीनुसार, संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४,४३,७०,८७८ झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा