31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषनेपाळवरून येऊन 'ते' करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !

नेपाळवरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !

आंब्याच्या राजासाठी दरवर्षी २,३०० किलोमीटरचा प्रवास

Google News Follow

Related

विशाल शाही हे नेपाळीपेक्षा बहुधा महाराष्ट्रीयन आहेत. मध्य-पश्चिम नेपाळमधील सुरखेत येथील ३० वर्षीय तरुण आंब्याच्या बागांत काम करण्यासाठी जवळजवळ एक दशकापासून दर ऑक्टोबरमध्ये रत्नागिरीत येतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये विखुरलेले सुमारे ९०,००० ते १ लाख नेपाळी लोकांचे संघटन आहे जे ‘पिवळे सोने’ काढण्यासाठी, फांद्यांची छाटणी, खते फवारणी आणि आंतरपीक यासाठी २,३०० किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रात रत्नागिरी येथे येतात.

‘टाइम्स ऑफ इंडियाशी ‘माहिती देताना विशाल म्हणतो, मी आणि माझे काका,वडील माझे नातेवाईक आम्ही सर्वजण मिळून दरवर्षी येतो. मी नेपाळच्या डोंगराळ प्रदेशातून येतो. माझे गाव खूप छोटे असल्याने तिकडे काही काम नसते. तेव्हा आम्ही दरवर्षी माझे जवळपास ४०-५० नातेवाईक आणि मित्रांसोबत आंबा कापणीच्या महिन्यात मजूर म्हणून येतो. नेपाळींची पहिली तुकडी रत्नागिरीत कशी स्थलांतरित झाली हे कोणालाच माहीत नाही. परंतु त्यांची जमात वाढत आहे आणि त्यांच्या कामाची व्याप्ती वाढत आहे.  माती समृद्ध करण्यापासून ते खतांची फवारणी, फळांची काढणी आणि वर्गीकरण करणे ते शेत स्वच्छ करणे आणि जनावरांना दूर ठेवणे अशी कामे करतात.

हे ही वाचा:

शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या

मन की बात.. हा माझ्यासाठी श्रद्धा, उपासना, अहम ते वयमचा प्रवास!

दंतेवाड्यात दोन महिने आधीच पेरण्यात आली होती स्फोटके !

मुंबई मेट्रोतून करा २५ टक्के सवलतीच्या दरात प्रवास

नेपाळी हे ऑक्टोबरमध्ये येतात आणि जूनच्या सुरुवातीपर्यंत राहतात. नेपाळमधून त्यांचे प्रवेशाचे पहिले बंदर दिल्ली आहे आणि बरेच लोक सीमेवरून तेथे जाण्यासाठी बसमधून जातात. त्यानंतर ते महाराष्ट्रातील आंबा पिकवणाऱ्या प्रदेशात येण्यासाठी रत्नागिरीला ट्रेनमध्ये बसतात. तथापि, बिरेन रावल सारखे काही लोक आहेत जे भारत-नेपाळ सीमेवरून बसने चार दिवसांच्या खडतर प्रवासानंतर थेट रत्नागिरीतील हातखंबा गाठतात. कशेरी येथील आंबा शेतकरी विद्याधर गोठणकर म्हणतात ते येताच मोठ्या जुन्या झाडांवर आपली घरे टाकतात; काही बागेच्या बाहेरच्या घरात राहतात.

“पूर्वी काहीजण शेडमध्ये राहायचे पण सर्पदंशाच्या घटना घडत होत्या त्यामुळे ते मचाणावर राहणे पसंत करतात. गोठणकर पुढे म्हणतात ,स्थानिक मजूर सकाळी ९ वाजता येतात. दुपारी जेवण्यासाठी सुट्टी आणि संध्याकाळी ५. ३० ला घरी निघून जायचे. मात्र आंब्यांच्या बागेत काम करण्याची पद्धत बदलत असल्याने बाहेरून मजूर आणावे लागले. त्यासाठी नेपाळी कामगार दिवस- रात्र उपलब्ध आहेत. नेपाळी कामगार आपल्या कामाची सुरुवात सकाळी ७ वाजता करतात आणि सूर्यास्तापर्यंत आंबे तोडतात.

आता सकाळी जे आंबे तोडले जातात ते त्याच रात्री पाठवले जातात. त्यामुळे आता शेतीचे काम चोवीस तास चालू असते असे खानविलकर या आणखी एक शेतकऱ्याने सांगितले. गुरखे रात्रीच्या वेळीही बागांची काळजी घेतात. आज प्रत्येक आंबा शेतकऱ्याकडे ८० ते २०० नेपाळी आहेत. भाडेतत्त्वावर घेतलेल्या झाडांच्या संख्येवर त्यांची अवलंबून असते. हंगामाच्या शेवटी, नेपाळी पुढील वर्षाच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत करून ठेवतात. हे नेपाळी कामगार आंबा काढणीचा हंगाम संपल्यानंतर घरी जाताना आपल्या कुटुंबकबिल्यासाठी अंदाजे ८० हजार रुपयांच्या आसपास कमावलेले उत्पन्न आणि सोबतच गोड हापूस आंब्यांची भेट घेऊन जातात.

नेपाळ शेतमजूर कृष्णा शाही म्हणतात ,” दरवर्षी आम्ही आमच्या गावी परतल्यावर येथील इतर तरुण मुले आम्ही किती पैसे कमावलेले हे उत्सुकतेपोटी जाणून घेतात. आम्ही आणलेल्या आंब्याची चव चाखतात आणि पुढच्या वर्षी रत्नागिरीला जातांना आम्हालाही घेऊन जा असा आग्रह धरतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा