34 C
Mumbai
Sunday, November 3, 2024
घरविशेषअहमदनगर-आष्टी रेल्वेचे डबे आगीने वेढले

अहमदनगर-आष्टी रेल्वेचे डबे आगीने वेढले

कोणतीही जीवितहानी नाही

Google News Follow

Related

अहमदनगर- आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नगरमधील शिराडोह परिसरातील रेल्वेला ही आग लागली आहे. ही आग लागताच सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीबाहेर काढण्यात आलं आहे. तर काहींनी आग लागल्याचे समजताच गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, ही आग इतकी भीषण होती की त्यामध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

गाझा पट्टीत दफनभूमीची जागा संपली; आईस्क्रीमच्या ट्रकमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

युएनच्या गाझा पट्टीतील कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश व्हायरल

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!

भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र

रेल्वे गाडीला ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची चौकशी करण्यात येणार आहे. संध्याकाळी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. या ठिकाणी आता अग्निशमन दल पोहोचलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडूनही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा