28 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेषहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं...?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं…?

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Google News Follow

Related

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.उद्धव ठाकरे गटाची काल वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये समाजवादी जनता पक्षाबरोबर बैठक पार पडली.या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर आशिष शेलार यांनी आज ट्विट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं…?

उद्धव ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाची युती झाली आहे. वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक रविवारी संपन्न झाली.या बैठकीत उद्धव ठाकरे भाजपवर टीका केली. ते म्हणाले, मी जसा आहे तसा आहे, स्वीकारा अथवा नाकारा. आज समाजवादींचे २१ पेक्षा अधिक गट माझ्यासोबत आले हे माझे भाग्य आहे. लढाई ही विचारांशी असते व्यक्तींशी नसते. त्यामुळे आपल्याला विचारांचा लढा पुढे न्यायचा आहे.

हे ही वाचा:

सचिन तेंडुलकरने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण

उद्धव ठाकरे आता समाजवाद्यांच्या पंगतीत

क्रिकेट सामन्यातील विजयानंतर इस्रायलच्या राजदूतांकडून भारताचे अभिनंदन, पाकवर टीका

गोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!

”आजही मला लाडके माजी मुख्यमंत्री म्हणतात, मला कुटुंबप्रमुख असल्याचा आनंद वाटतोय. समाजवादीसोबत आम्ही आलो आहोत तर तिकडचे लोक असं झालं, तसं झालं म्हणतील. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी क्रिकेटवर फुलांचा वर्षाव भाजप करत असेल तर शिवसेना म्हणून मी समाजवाद्यांशी का बोलू शकत नाही?”ठाकरे पुढे म्हणाले, समाजवादीतले लोक काय देशाबाहेरुन आले आहेत का? आमचे मतभेद होते, ते आम्ही गाडून टाकले आहेत, तुम्हाला काय करायचंय? देशावर प्रेम करणारे मुस्लिम सोबत आले तर पोटात दुखण्याचं कारण काय? असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

या टीकेला भाजप मुंबई आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.आशिष शेलार ट्विट करत म्हणाले, ◆शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं! ◆श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले ! ◆राम मंदिरावर टीका करुन दाखवली ! ◆हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली ! ◆छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले ◆छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले! ◆वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं !
“गर्व से कहो हम हिंदू हैं” म्हणणारी शिवसेना आता.. “गर्व से कहों हम समाजवादी हैं” म्हणू लागली..! भविष्यात कदाचित “गर्व से कहो हम MIM हैं” सुध्दा म्हणू लागतील!! असे म्हणत शेलार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा