26 C
Mumbai
Monday, December 11, 2023
घरविशेषगोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!

गोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!

स्टेडियममधील जय श्रीरामच्या घोषणांवरून केले होते ट्विट

Google News Follow

Related

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शनिवार १४ ऑक्टोबर रोजी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील भारत-पाकिस्तानचा सामना पार पडला.भारत-पाकिस्तान सामना दरम्यान स्टेडियममध्ये जय श्री रामाच्या जयघोषाचे नारे लावण्यात आले.पाकिस्तानी खेळाडू बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जात असताना भारतीय क्रिकेट चाहत्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या.यावर भारतीय पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी अशा वागण्याला टिंगलपणा असल्याचे ट्विट केले.सरदेसाई यांच्या ट्विटला माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी उत्तर देत त्यांनी आपल्या १६ व्या वर्षांच्या वयात क्रिकेट खेळासाठी पाकिस्तानला भेट दिली तेव्हा त्यांनी स्वतः अनुभवलेला भयंकर अनुभव ट्विट द्वारे सांगितला.

घडले असे की, पाकिस्तान खेळाडू मोहम्मद रिझवान हा बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना भारतीय चाहत्यांनी एकच जय श्री रामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांनी आपली मते नोंदवली.त्यानंतर या वादाला सुरुवात झाली.

हे ही वाचा:

नीरज चोप्राचे जागतिक ऍथलेटिक्स संघटनेकडून कौतुक!

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना फोन!

मुघलांनी मराठा समाजात फूट पाडली, तेच शरद पवार, काँग्रेसच्या नेतृत्वात करू नका!

क्रिकेट सामन्यातील विजयानंतर इस्रायलच्या राजदूतांकडून भारताचे अभिनंदन, पाकवर टीका

 

या वादाला तोंड देण्यासाठी भारतीय पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी उडी घेतली.त्यांनी ट्विट करत म्हणाले, “दुपारचे संगीत: सकाळी आमच्या उद्यानात, आम्ही एकमेकांना प्रेमळ अभिवादन म्हणून ‘राम राम’ म्हणतो. मग पाकिस्तानी खेळाडूंची टिंगल करण्यासाठी जय श्री राम हा आक्रमक मंत्र का वापरायचा? प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत: त्यांनी ज्ञान मिळवले पाहिजे, शत्रुत्व निर्माण करू नये. सहमत आहे का?🙏”असे त्यांनी ट्विट केले.त्यानंतर काही वेळातच त्यांचे हे ट्विट व्हायरल झाले आणि त्यानंतर कोणी सहमती दाखवली तरी कोणी चुकीचे असल्याचे म्हटले.

राजदीप सरदेसाई यांच्या ट्विटला माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी वयाच्या १६ व्या वर्षात पाकिस्तानला खेळासाठी गेले असताना त्यांनी अनुभवलेला अनुभव सांगितला.ते म्हणाले, पाकिस्तानमध्ये मी १६व्या वर्षी खेळण्यासाठी गेलो असताना माझ्यावर काय अत्याचार झाले, हे फक्त मलाच माहीत आहे. माझ्या रंगापासून माझ्या धर्मापर्यंत माझ्या देशापर्यंत आणि संस्कृतीपर्यंत. स्वर्गाच्या फायद्यासाठी, जर तुम्ही ते अनुभवले नसेल तर कृपया याबद्दल बोलू नका,”असे त्यांनी ट्विट केले आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
113,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा