27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषरुग्णवाहिकेतून सायरन वाजवत गेले गरबा खेळायला!

रुग्णवाहिकेतून सायरन वाजवत गेले गरबा खेळायला!

तीन वाहनांना धडक, कोल्हापुरातील घटना

Google News Follow

Related

कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम ते नॉर्थ स्टार हॉस्पिटल परिसरात एका रुग्णवाहिकेनं एक चार चाकी आणि दोन दुचाकींना धडक दिली. सायरन वाजवत सुसाट चाललेल्या अॅम्बुलन्सने तीन वाहनांना धडक दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेला थांबवले.रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये महिला असल्याचे दिसून आले.गरबा खेळण्यासाठी अॅम्बुलन्सचा वापर केल्याचा असा अतरंगी प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-०९ एफएल-६७०९ ही सरकारी दवाखान्याची रुग्णवाहिका रविवारी रात्री दहाच्या सुमारास हॉकी स्टेडियम समोरून गोखले महाविद्यालयाच्या दिशेने सायरन वाजवत भरधाव निघाली होती.या रुग्णवाहिकेनं तीन वाहनांना ओव्हरटेक केल्यानंतर पुढे जाऊन चारचाकी गाडीला धडक दिली.काही नागरिकांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग सुरु केला आणि रुग्णवाहिकेला थांबवले.तेव्हा चालकाशेजारी दोन युवती बसल्याचे दिसून आले. यानंतर रुग्णवाहिका चालकास दार उघडण्यास सांगितले सुरुवातीला त्याने नकार दिला.

हे ही वाचा:

युएनच्या गाझा पट्टीतील कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश व्हायरल

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!

भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र

गोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!

मात्र, संतप्त जमावाला पाहून चालकाने दार उघडले. दार उघडल्यानंतर त्या रुग्णवाहिकेमध्ये गरबा खेळायला जाणाऱ्या तरुणी असल्याचे उघडकीस आले. या सगळ्या तरुणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असल्याची माहिती आहे.जमावाने त्यांची विचारपूस केली असता आम्ही वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून, गरबा खेळण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले.स्थानिकांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण घटनेची माहिती दिली.त्यानंतर गस्ती पथक घटनास्थळी दाखल होऊन रुग्णवाहिकेच्या चालकाच्या परवान्याचे फोटो काढले व पुन्हा असा प्रकार घडू नये अशी सक्त ताकीद दिली आणि रुग्णवाहिका सोडून दिली.मात्र, गरबा खेळायला जाण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याने भागात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा