25 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024
घरविशेषगिरणा नदीत अडकलेल्या १२ तरुणांना हेलिकॉप्टरने केलं रेस्क्यू !

गिरणा नदीत अडकलेल्या १२ तरुणांना हेलिकॉप्टरने केलं रेस्क्यू !

पुराच्या पाण्यामुळे २० तास राहिले होते अडकून

Google News Follow

Related

गिरणा नदी पात्रात अडकलेल्या १२ जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. रविवारी (४ ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास १२ जण मासे पकडण्यासाठी नदी पात्रात गेले होते. पुराच्या पाण्यामुळे हे लोक तेथेच अडकून राहिले. अखेर त्यांना आज रेस्क्यू करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने १२ जणांना नदी पात्रातून बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे.

रेस्क्यू करण्यात आलेले हे लोक धुळे आणि मालेगाव मधील असल्याची माहिती आहे. हे सर्व शहराजवळील संवदगावलगत गिरणा नदीपात्रातील मासेमारीसाठी गेले होते. मात्र, नदी पात्रात पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ते १२ जण तेथेच अडकून पडले. मालेगाव महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख डॉ. संजय पवार यांना याची माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. परंतु, पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीपात्रातील या टेकडीपर्यंत मदतकार्य पोहोचविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मर्यादा आल्या. रात्र झाल्याने मदतकार्यातील अडचणींमध्ये वाढ झाली. त्यामुळे धुळे येथून खास बचाव पथकास पाचारण करण्यात आले. मात्र पाण्याचा मोठा प्रवाह तसेच रात्रीची वेळ यामुळे बचावकार्यास अढथळा निर्माण झाला.

हे ही वाचा..

कलम-३७० हटवून आज ५ वर्षे पूर्ण, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक !

बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार, ९८ जणांचा मृत्यू !

युद्धबंदीची चर्चा अयशस्वी, इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू !

महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन पडले महागात, टीएमसी मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा !

अखेर नदी पात्रात अडकलेल्या प्रशासनाने आज सुखरूप बाहेर काढले आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्या १२ जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. नदी पात्रात काही वेळ हेलिकॉप्टरला लँडिंग करणे शक्य होत न्हवते. मात्र, सुरक्षा पथकाने हेलिकॉप्टर व्यवस्थित लँडिंग करून १२ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
176,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा