31 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरविशेषएकीकडे अपघात झाला आणि दुसरीकडे कोंबड्या पळवल्या!

एकीकडे अपघात झाला आणि दुसरीकडे कोंबड्या पळवल्या!

अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी

Google News Follow

Related

आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर दाट धुक्यामुळे बुधवारी सकाळी उन्नावजवळ एक मोठा अपघात झाला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि दोन डझनहून अधिक जण जखमी झाले.या महामार्गावर कोंबड्यांनी भरलेली गाडी देखील होती.महामार्गावर उभी असलेली गाडी पाहून लोकांनी वाहनातून भराभर कोंबड्या पळवून नेल्या.जखमी वाहनचालक आरडाओरड करत होता मात्र लोकांनी दुर्लक्ष करत कोंबड्या पळवून नेण्यात मग्न राहिले.

आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर २७ डिसेंबर बुधवार रोजी दाट धुक्यामुळे हा अपघात आला.मार्गावरील एका डबलडेकर बसने दाट धुक्यामुळे नियंत्रण गमावले आणि मध्यवर्ती दुभाजकावर बस धडकली.यांनतर मागून येणारी वाहने एकमेकांवर आदळत गेली.या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातात सुनील कुमार यांचीही गाडी होती.सुनीलने सांगितले की, त्याची गाडी कोंबड्यांनी भरलेली होती आणि ते आग्राहून कासगंजला जात होते.

हे ही वाचा:

फ्रॉड लोन ऍपच्या जाहिराती दाखवाल तर खबरदार!

राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण नाकारणाऱ्या येचुरींना विहिंपचा सल्ला

भारत जोडून झाल्यावर राहुल गांधींची आता न्याय यात्रा

झाडांची पाने खाऊन दिवस ढकलले…अवैध मार्गाने परदेशात गेलेले सहा जण परतले

याच दरम्यान दाट धुक्यामुळे गाडीचा अपघात झाला.अपघात होता तेव्हा पहाटेची वेळ होती.अपघातानंतर सुनीलने आपली गाडी रस्त्यावर सोडून रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला.मात्र, सकाळ होताच लोकांना गाडीचा अपघात झालेला दिसून आला आणि लोकांनी गाडीतील कोंबड्या पळवून नेण्यास सुरुवात केली.लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा बाजूला वाहने थांबवून कोंबड्यांची लूट केली.सुनील पुढे म्हणाला की, सुरवातीला मी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु जमावासमोर काहीच करू शकलो नाही.गाडीत सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या कोंबड्या होत्या.मोठे नुकसान झाल्याचे सुनीलने सांगितले.

दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी असणाऱ्या सहा प्रवाशांना लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.पोलीस आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत करत होते.या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये वाहने एकमेकांवर आढळल्याचे दिसत आहे.रस्त्यावर वाहनांची रांग लागल्याचेही दिसत आहे. पोलीस आणि आपत्कालीन बचाव कर्मचारी बचाव कार्यात गुंतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे हा अपघात घडला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा