29 C
Mumbai
Sunday, June 23, 2024
घरविशेष‘अमेठीतून निवडणूक हरण्यासाठी तुम्ही पैसे घेतले होते का?’

‘अमेठीतून निवडणूक हरण्यासाठी तुम्ही पैसे घेतले होते का?’

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Google News Follow

Related

एआयएमआयएम म्हणजेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देऊन पलटवार केला. राहुल यांनी एआयएमआयएमवर भाजपकडून पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर ओवैसी यांनी राहुलना ‘तुम्ही अमेठीतून पराभूत होण्यासाठी पैसे घेतले होते का?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एआयएमआयएमवर आरोप केले होते की, जिथे जिथे काँग्रेस पक्ष भाजपच्या विरोधात उमेदवार उतरवतो, तिथे तिथे ओवैसी यांचा पक्ष आपला उमेदवार उभा करतात. त्यावर ओवैसी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘तुम्ही अमेठीतील निवडणूक फुकटात गमावली होती की, त्यासाठी पैसे घेतले होते? तुम्ही २०१४ची निवडणूक हरला आहात आणि यासाठी मी जबाबदार नाही,’ असे स्पष्टीकरण ओवैसी यांनी दिले.

हे ही वाचा:

कर्णफुलासाठी त्याने केली वृद्धेची हत्या; गुन्ह्याचा उलगडा झाला

कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

वानखेडे स्टेडियम वर्ल्डकपदरम्यान आतषबाजीने रंगणार नाही

भरधाव दुचाकीची १६ वर्षीय मुलीला धडक; बसनेही चिरडले

तसेच, सन २०१२मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत तत्कालीन यूपीए सरकारचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना समर्थन देण्यासाठी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वायएस जगनमोहन रेड्डी यांचे मन वळवण्यासाठी त्यांच्या पक्षाला किती पैसे दिले गेले होते?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच या दोन पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद आता किती थराला जातील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा