29 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
घरविशेषवानखेडे स्टेडियम वर्ल्डकपदरम्यान आतषबाजीने रंगणार नाही

वानखेडे स्टेडियम वर्ल्डकपदरम्यान आतषबाजीने रंगणार नाही

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी घेतला निर्णय

Google News Follow

Related

विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान मुंबई आणि दिल्लीतील क्रिकेटरसिकांना आतषबाजीचा आनंद लुटता येणार नाही. दोन्ही शहरांची हवा गुणवत्ता बिघडत असल्याने येथे आतषबाजी न करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. गुरुवारी वानखेडे स्टेडिअमवर भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर, सोमवारी दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना रंगणार आहे.

 

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एका वृत्तपत्राला ही माहिती दिली. ‘मी याबाबत अधिकृतरीत्या आयसीसीला कळवले आहे. या दोन्ही ठिकाणी आता आतषबाजी होणार नाही. त्यामुळे शहरांच्या प्रदूषणस्तरात वाढ होऊ शकते. पर्यावरणाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी बीसीसीआय कटिबद्ध आहे. आम्ही नेहमीच आमच्या हितचिंतकांच्या हिताचा विचार करतो. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांमधील हवेच्या ढासळल्या गुणवत्तेबाबत आम्हालाही चिंता वाटते,’ अशी प्रतिक्रिया जय शहा यांनी दिली. या निर्णयामुळे समाजातही चांगला संदेश प्रसृत होईल, नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती होईल, असे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच!

डाव्यांची काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली; तीन राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात

रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदाचे रहस्य

पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला राजस्थानमधून अटक

दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये वाईट हवामान

दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये मंगळवारी अतिशय वाईट हवामान होते. सकाळपासूनच येथे धुके पसरले होते. सलग चौथ्या दिवशी येथील वातावरण वाईट नोंदवले गेले. या खराब हवामानाला गाड्यांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा ११ ते १६ टक्के वाटा असून शेतजमिनींमध्ये राब जाळल्याचा सात ते १६ टक्के वाटा असल्याचे भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या विकसित संख्यात्मक मॉडल-आधारित प्रणालीच्या निष्कर्षात उघड झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा