32 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरविशेषअरेरे !! पत्नीच्या मृतदेहासोबत केला ५०० किमी प्रवास

अरेरे !! पत्नीच्या मृतदेहासोबत केला ५०० किमी प्रवास

घटना लक्षात आल्यानंतर नवऱ्याला धक्का बसला, पुढच्या स्टेशनवर उतरवला मृतदेह

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशात एक विचित्र घटना घडली. लुधियाना रेल्वे स्थानकावरून एक व्यक्ती आपल्या पत्नीसह गाडीमध्ये चढले. प्रवास सुरु झाला पण वाटेत आपल्या पत्नीचा मृत्यू कधी झाला याचा पत्ताही त्याला लागला नाही. पत्नीच्या मृतदेहासह जवळपास ५०० किलाेमीटरचा प्रवास त्याने केला.

बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात राहणारे नवीन हे आपली पत्नी उर्मिला यांच्यावर उपाचार करण्यासाठी लुधियाना येथे गेले हाेते. लुधियानाहून बिहारला जाण्यासाठी पती-पत्नी मयूरध्वज ट्रेनमध्ये बसले होते. काही किलोमीटर चालल्यानंतर त्यांच्या पत्नीचा रेल्वेतच मृत्यू झाला. तिकीट तपासनीस तिकीट विचारण्यासाठी आला त्यावेळी त्याला पत्नीच्या मृत्यूचा उलगडा झाला.या घटनेची तातडीने शहाजहानपूर जीआरपीला रेल्वे कर्मचाऱ्यांनी माहिती दिली, त्यानंतर मृतदेह शाहजहांपूर रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आला. हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे नवीन यांना माहीत नव्हते.  नवीन म्हणाला की त्याची पत्नी ट्रेनमध्ये चढल्यानंतर झोपली होती आणि झोपेत असताना पत्नीचा मृत्यू झाला हे त्याला कळले नाही. सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास झाला तोपर्यंत नवीन यांना पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळलेच नाही.

शहाजहानपूर स्टेशनवर मृतदेह उतरवला

जेव्हा टीटीईने नवीनकडे ट्रेनमध्ये तिकीट मागितले तेव्हा त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे त्याला समजले. ही बाब लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी शहाजहानपूर जीआरपीला माहिती दिली. त्यानंतर मृतदेह शाहजहानपूर रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा