30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
घरविशेषशेवटच्या चेंडूवर हैदराबादचा विजय

शेवटच्या चेंडूवर हैदराबादचा विजय

भुवनेश्वर कुमारने राजस्थानकडून हिरावला विजयाचा घास

Google News Follow

Related

आयपीएलमध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादने राजस्थानवर शेवटच्या चेंडूवर एका धावाने विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्याकडे दिली होती. तर, रोव्हमॅन पॉवेल फलंदाजी करत होता. भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर पॉवेल एलबीडब्लू झाला आणि सामनाच फिरला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १३ धावा हव्या होत्या.

राजस्थानने हा सामना जिंकला असता तर, या हंगामात प्ले ऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरला असता. राजस्थानने आतापर्यंत १०पैकी आठ सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात १६ गुण जमा झाले असून गुणतक्त्यात त्यांचा अव्वल क्रमांक कायम आहे. या विजयामुळे हैदराबादनेही पाचव्या क्रमांकावरूनही चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सलग दोन पराभवानंतर त्यांनी हा विजय मिळवला आहे. हैदराबादने आतापर्यंत १०पैकी सहा सामने जिंकले आहेत. चार शिल्लक आहेत.

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये हा सामना रंगला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या हैदराबादने २०२ धावांचे लक्ष्य राजस्थानला दिले. प्रत्युत्तरादाखल राजस्थानचा संघ सात विकेट गमावून २०० धावाच करू शकला. राजस्थानच्या रियान परागने ४९ चेंडूंत ७७ धावा केल्या. तर, यशस्वी जयस्वालने ४० चेंडूंत ६७ धावा केल्या. शेवटच्या षटकात रॉवमॅन पॉवेलने १५चेंडूंत २७ धावा केल्या. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

हे ही वाचा:

‘हिंदूंवर जिझिया कर’

इंदोरमध्ये लव्ह जिहाद; मुलीला अडकवण्यासाठी विवाहित शाहरूख शेख झाला यश जैन

दुबईला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका

उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्न स्टारची भूमिका!

हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने तीन तर, कर्णधार पॅट कमिन्स व नटराजन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. हैदराबादने तीन विकेट गमावून २०१ धावा केल्या. हैदराबादची अवस्था दोन बाद ३५ अशी झाली होती. त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि नीतीश रेड्डी यांनी ५७ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. नीतीशने ४२ चेंडूंत ७६ धावांची खेळी केली. तर, हेडने ४४ चेंडूंत ५८ धावा केल्या. नीतीशने ३० तर हेडने ३७ चेंडूंत ५० धावा केल्या. हेन्रिक क्लासेन याने १९ चेंडूंत ४२ धावा केल्या. तर, राजस्थानचा जलदगती गोलंदाज आवेश खान याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. संदीप शर्मा याला एक विकेट मिळाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा