26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरविशेषबॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही

बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही

Related

शाहरुख खान, आर्यन खान किंवा बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले पुन्हा एकदा केले आहे. शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेले काही दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांनी एका कार्यक्रमा दरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. त्यामुळे गोखले यांच्यावर टीका देखील होत होती. या सर्व बाबींवर विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे.

यावेळी बोलताना माध्यमांना कुठे काय प्रश्न विचारावेत हे समजत नाही असा घणाघात गोखले यांनी केला आहे. शाहरुख खान आणि आर्यन खान या प्रकरणावर काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. पत्रकारांनी त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला होता. या संदर्भात विक्रम गोखले यांनी पुन्हा आपली बाजू मांडली आहे. आर्यन खान प्रकरणाच्या बाबत बोलताना मी या आधीही सांगितले होते की तो माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही. तो एक शुल्लक विषय आहे.

हे ही वाचा:

भारताने दिल्या १०० देशांना लशी!

भारतीय फुटबॉलचा आवाज हरपला; नोवी कपाडिया यांचे निधन

मी माझ्या वक्तव्यांवर ठाम! स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही

तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

आर्यनच्या बातमीच्या आधी सीमेवर लढताना आपला महाराष्ट्रातील त्याच वयाचा एक जवान शहीद झाला होता. तो माझ्यासाठी खरा हिरो आहे असे गोखले म्हणाले होते. हे आपले म्हणणे गोखले यांनी पुन्हा एकदा मांडले. तर माझे नाव विक्रम चंद्रकांत गोखले आहे. तेच मी लावतो. मी माझ्या बापाचे नावे बदलले नाही. त्यामुळे शाहरुख खान, आर्यन खान किंवा बॉलिवूड मधील इतर कोणीही माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत असे विक्रम गोखले यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा