27.1 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरविशेषसरकार आवडत नसेल तर निवडणूक लढवा!

सरकार आवडत नसेल तर निवडणूक लढवा!

दिमागी नक्षल म्हणवून घेणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांना पुनीत इस्सर यांनी सुनावले

Google News Follow

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या सरकारविरोधी भूमिकेवर अभिनेते पुनीत इस्सर यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारची धोरणे आवडत नसतील, तर राजकारणात उतरून निवडणूक लढवा आणि जनतेचा कौल मिळवा, असे आव्हान इस्सर नसीरुद्दीन शाह यांना दिले. नसीरुद्दीन शाह ह हे निवडक मुद्द्यांवरच भूमिका मांडतात, असा आरोपही त्यांनी केला.

पुनीत इस्सर यांनी नसीरुद्दीन शाह यांचा ज्येष्ठ कलाकार म्हणून आदर असल्याचे स्पष्ट केले. नसीरुद्दीन शाह हे उत्तम कलाकार असून ते आपले ज्येष्ठ आणि शिक्षकही आहेत, असे त्यांनी म्हटले. मात्र, सार्वजनिक मुद्द्यांवर बोलताना निवडक भूमिका घेऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. भारत आणि जगातील अनेक विषयांवर मौन का बाळगले जाते, असा सवालही इस्सर यांनी उपस्थित केला.

सरकारवर टीका करण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे इस्सर यांनी मान्य केले. मात्र, सत्तेवर असलेले सरकार पसंत नसेल, तर राजकीय मैदानात उतरून निवडणूक लढवावी, जनतेचा पाठिंबा मिळवावा आणि सरकारला पराभूत करावे, असे ते म्हणाले. सध्याचे सरकार मनमानी पद्धतीने सत्तेवर आलेले नसून देशातील जनतेने मतदान करून त्याची निवड केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

इस्सर यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) घडामोडी, तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ व्यक्त होणाऱ्या भूमिका आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांच्या सुटकेच्या मागण्यांचाही उल्लेख केला. अशा प्रकरणांमध्ये भूमिका घेणाऱ्यांनी देशाबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण द्यावे, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

न्यायालयावरील आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी संजय राऊतांची बिनशर्त माफी

‘JAI’च्या माध्यमातून हिंद-प्रशांतमध्ये सामरिक समीकरणांना बळ

संजय राऊत, निखिल वागळे हाजिर हो!

कोकण रेल्वेच्या संचालक (वित्त)पदी कविता राकेश साटवी यांची नियुक्ती

जामिया आंदोलनाच्या समर्थनावरून वाद

नसीरुद्दीन शाह यांनी अलीकडेच जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. विद्यार्थी संघटनेच्या पुनर्स्थापनेसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. शाह यांनी मंगळवारी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये स्वतःला अभिमानाने ‘दिमागी नक्षल’ म्हणवून घेतले. “मी हे अभिमानाने सांगतो, मी दिमागी नक्षल आहे. माझ्यासारख्या लोकांना पहारेकऱ्यांनी आणखी काय टोपणनावे दिली आहेत हे मला माहीत नाही. देशद्रोही, तुकडे तुकडे गँग, आणि अजून काय काय.”

केंद्रातील सरकार शिक्षणव्यवस्थेला कमकुवत करण्याचा आणि तरुणांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी शाह यांनी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (SRFTI) विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला होता. जेएनयू, एसआरएफटीआय आणि आता जामिया येथील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या कथित अन्यायाची नोंद घेतली जाईल, असे त्यांनी म्हटले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा