29 C
Mumbai
Saturday, January 3, 2026
घरविशेषमजारवर रातोरात बेकादेशीर बांधकाम, भाजपाच्या तक्रारीनंतर मुस्लिमांनी स्वतःच तोडले!

मजारवर रातोरात बेकादेशीर बांधकाम, भाजपाच्या तक्रारीनंतर मुस्लिमांनी स्वतःच तोडले!

उत्तर प्रदेशच्या बरेलीतील घटना

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका मजारीवर बेकायदेशीर कायमस्वरूपी बांधकाम करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी सिमेंटचे खांब उभारून बांधकाम चढवण्यात आले होते. हा प्रकार भाजपच्या खासदाराच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तक्रार दाखल केली. यानंतर प्रशासनाने चौकशी करून नोटीस पाठवली. यानंतर मुस्लिमांनी स्वतःच बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास सुरुवात केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बरेलीच्या शाही पोलीस स्टेशन परिसरातील गणेशपूर गावात घडली. येथे एका स्मशानभूमीत एक जुनी मजार बांधलेली होती. ही कबर सुमारे ३०-४० वर्षे जुनी असल्याची माहिती आहे. स्थानिक मुस्लिमांनी रात्रीच्या वेळी त्याभोवती २० फूट उंच खांब उभारून बांधकाम सुरु केले.

रात्रीच्या वेळी काम करून त्यांनी मजारवर बेकादेशीर बांधकाम वाढवले. या बांधकामासाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती किंवा त्यांना माहिती देण्यात आली नव्हती. बरेलीचे खासदार छत्रपाल सिंह गंगवार या गावाजवळून जात असताना हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यांनी या ठिकाणी भेट देऊन माहिती गोळा केली.

हे ही वाचा : 

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामागे पुनर्विकास प्रकल्प? मुलाच्या जबाबात कंबोज आणि अनिल परब यांचा उल्लेख

त्रिपुरात ५ दिवसांत १४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, तस्करही ताब्यात!

झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक; तोडफोडीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

तामिळनाडूमध्ये इसिस मॉड्यूल प्रकरणी १६ ठिकाणी एनआयएकडून छापेमारी

यानंतर त्यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची तक्रार केली. खासदाराच्या तक्रारीनंतर एसडीएमने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने चौकशी केली तेव्हा हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. यानंतर, हे बांधकाम तातडीने पाडण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासन तोडक कारवाई करणार त्यापूर्वी स्थानिक मुस्लिमांनी बांधकाम पडण्यास सुरुवात केली. मजारवरील बेकादेशीर बांधकाम मुस्लिमांनी स्वतःच तोडून काढले.

या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी गावातील १०० लोकांविरुद्ध शांतता भंग करण्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. यांना ५ लाख रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा