26 C
Mumbai
Saturday, February 15, 2025
घरविशेषछत्तीसगडमध्ये भाजपकडून चहा विक्रेत्याला महापौर पदाची उमेदवारी!

छत्तीसगडमध्ये भाजपकडून चहा विक्रेत्याला महापौर पदाची उमेदवारी!

मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी विजयासाठी दिल्या शुभेच्छा

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील २०२५ च्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आपल्या सर्व दहा महापालिकांच्या महापौरपदासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपाच्या यादीत बहुतांश तरुण आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राध्यान्य देण्यात आले आहे. याच दरम्यान, भाजपाने रायगडमधून उभा केलेल्या उमेदवाराची जोरदार चर्चा सुरु आहे. जीवनवर्धन चौहान असे त्यांचे नाव असून ते एक चहा विक्रेते आहेत. त्यामुळे यांच्या नावाची चर्चा होत आहे. जीवनवर्धन चौहान हे गेल्या २९ वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आणि मोदी सरकारच्या हमी योजनांमुळे सर्व महापालिकेत पक्षाला यश मिळेल विश्वास व्यक्त केला.

रायगडमधील भाजपचे उमेदवार जीवनवर्धन चौहान हे चहा विकून चौहान आपला उदरनिर्वाह चालवतात. गेल्या २९ वर्षांपासून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. रायगड महानगरपालिकेची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. येथून जीवनवर्धन चौहान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय यावेळी पक्षाने महिला उमेदवारांनाही तितकाच सहभाग देऊन संधी दिली आहे. रायपूरमधून मीनल चौबे, दुर्गमधून अलका बागमार, कोरबामधून संजू देवी राजपूत, बिलासपूरमधून पूजा विधानी आणि अंबिकापूरमधून मंजुषा भगत यांना संधी देण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

मजारवर रातोरात बेकादेशीर बांधकाम, भाजपाच्या तक्रारीनंतर मुस्लिमांनी स्वतःच तोडले!

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामागे पुनर्विकास प्रकल्प? मुलाच्या जबाबात कंबोज आणि अनिल परब यांचा उल्लेख

त्रिपुरात ५ दिवसांत १४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, तस्करही ताब्यात!

झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक; तोडफोडीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

छत्तीसगडचे अर्थमंत्री ओपी चौधरी यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर माहिती देताना त्यांनी लिहिले की, प्रदेश भाजपने २९ वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे चहा विक्रेता आणि तळागाळातील कार्यकर्ते जीवनवर्धन चौहान यांना रायगडचे महापौरपदाचे उमेदवार केले आहे. मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी ट्वीटलकरत सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यासह सर्व महापालिकेत पक्षाला यश मिळेल असे म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
229,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा