28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषएनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!

एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!

९ जूनला तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या निकालात बहुमताचा आकडा पार केल्यानंतर आज भाजप प्रणित एनडीएतील घटक पक्षांची संसदेत महत्वाची वैठक पार पडली.या बैठकीत सर्व खासदारांची उपस्थिती होती.यावेळी माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दालनात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संविधानाला स्पर्श केला आणि संविधान आपल्या कपाळी लावले.दरम्यान, नरेंद्र मोदी ९ जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

लोकसभा निवडणूकीचा निकाल एनडीएच्या बाजूने लागला परंतु जशी अपेक्षा होती तशा जागा मिळाल्या नाहीत.कारण विरोधकांच्या इंडी आघाडीच्या नेत्यांनी जनतेच्या मनात भाजप-एनडीएबाबत संभ्रम निर्माण केला.भाजपच्या विरोधतात विरोधकांनी खोट्या अफवा पसरवत जनतेची दिशाभूल केली.देशात जर मोदी सरकार पुन्हा आले तर संविधान बदलतील अशी अफवा विरोधकांनी आपल्या प्रचारात पसरवण्याचे काम केले होते.संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि मोदी सरकार देखील ते बदलणार नाही, हे माजी पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रचारात सांगितले होते.विरोधकांच्या अफवांमुळे भाजपला काही जागांवर फटका बसला.दरम्यान, संविधान हे किती महत्वाचे आहे हे पुन्हा मोदींनी दाखवून दिले.

हे ही वाचा:

पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?

टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!

सलग आठव्यांदा आरबीआयचा रेपो रेट जैसे थे स्थितीत

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सफाई कर्मचारी, मजूर, केंद्रीय योजनांचे लाभार्थी उपस्थित राहणार

मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची आज शुक्रवारी (७ जून) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली.यावेळी नरेंद्र मोदींनी हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर संविधानाला स्पर्श करून डोक्याला लावले.मोदींच्या या कृत्यामुळे विरोधकांना आणि जनतेला समजले असेलच की, ‘देशाचे संविधान महत्वाचे आहे आणि हे मोदी सरकार बदलणार नाही’.

दरम्यान, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. येत्या ९ जून २०२४ ला संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा