30 C
Mumbai
Friday, June 21, 2024
घरराजकारण'तीन निवडणुकांत काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या आम्हाला एकाच निवडणुकीत मिळाल्या!'

‘तीन निवडणुकांत काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या आम्हाला एकाच निवडणुकीत मिळाल्या!’

नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर जोरदार निशाणा

Google News Follow

Related

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवार, ७ जून रोजी दिल्लीत बैठक पार पडली. यावेळी संसदीय दलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची एकमताने निवड करण्यात आली. तसेच या बैठकीला काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत पुन्हा एकदा काँग्रेससह विरोधकांच्या इंडी आघाडीवर जबरदस्त निशाणा साधला.

“पुढच्या १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करू शकणार नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत,” असा खोचक टोला नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला आहे. “पूर्वी इंडी आघाडी हळूहळू बुडत होती. पण, आता इंडी आघाडी जलद गतीने बुडणार आहेत. त्यांना अद्याप या गोष्टीचा अंदाज आलेला नाही,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

“काँग्रेस आपल्या पक्षाच्या पंतप्रधानाला किंमत देत नाहीत. त्यांचे अध्यादेश फाडतात. यांच्या नेत्यांना परदेशातील कार्यक्रमात खुर्ची नसायची. लोकशाही आपल्याला सर्वांचा आदर करायला शिकवते. विरोधी पक्षातही जे खासदार जिंकून आले आहेत, मी त्यांचंही अभिनंदन करतो. गेल्या १० वर्षांपासून मला एका गोष्टीची उणीव जाणवत होती. सखोल चर्चा, उत्तम वाद-विवाद या गोष्टींची उणीव भास होती, या नव्या खासदारांच्या निमित्ताने ही उणीव कमी भासेल अशी आशा व्यक्त करतो,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!

पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?

टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!

सलग आठव्यांदा आरबीआयचा रेपो रेट जैसे थे स्थितीत

“इंडिया आघाडी देशातील सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. भारताच्या सामान्य लोकांच्या व्यक्तीचीही काही मतं आहेत. जे नेते जमिनीशी जोडलेले असतात त्यांनाच सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकतात. पण ते तिथे कमी पडले. आशा करतो की ते लोकशाहीचा सन्मान करतील. परंतु, त्यांच्या व्यवहारामुळे वाटतं की कदाचित त्यांच्यात ही क्षमता येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागेल,” असंही नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा