30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेषपॅरिस ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूची बॅडमिंटन महिला एकेरीच्‍या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूची बॅडमिंटन महिला एकेरीच्‍या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

एस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबा हिचा केला पराभव

Google News Follow

Related

क्रीडा विश्वात महत्त्वाची समजली जाणारी अशी ऑलिम्पिक स्पर्धा सध्या फ्रान्समध्ये सुरू आहे. भारताचे खेळाडूही या स्पर्धेत सहभागी झाले असून साऱ्यांच्या नजरा या खेळाडूंवर आहेत. अशातच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकलेली भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने अजूनही या स्पर्धेत आपल्या पदकाच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. पी. व्ही. सिंधू हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुसरा गट सामना जिंकून प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबा हिला नमवत पी. व्ही. सिंधू हिने बाजी मारली आहे.

पी. व्ही. सिंधू हिने हा सामना एकतर्फी जिंकला. हा सामना तिने २१-५ आणि २१-१० असा सरळ दोन गेममध्ये जिंकत आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली. बॅडमिंटन महिला एकेरीच्‍या प्री-क्वार्टर फायनलमध्ये (उपउपांत्यपूर्व फेरी) सिंधू हिने धडक मारली आहे.

सामन्यात सुरुवातीपासूनच पी. व्ही. सिंधू हिने चांगली खेळी केली. पहिल्‍या गेममध्‍ये सिंधूने एस्टोनियाच्या कुबा हिला संधी फारशी न देता २१-५ असा विजय आपल्‍या नावावर केला. यानंतर दुसर्‍या खेळात सुरुवातील कुबा हिने आघाडी घेत कमबॅकचा प्रयत्‍न केला पण, पी. व्ही. सिंधूने आपला नैसर्गिक खेळ दाखवत वर्चस्‍व कायम ठेवले. दुसरा गेम तिने २१-१० असा जिंकला. या विजयासह बॅडमिंटन महिला एकेरीच्‍या प्री-क्वार्टर फायनलमध्ये (उपउपांत्यपूर्व फेरी) सिंधू हिने धडक मारली आहे. तिने महिलांच्या ‘गट एम’ मध्ये दोन सामन्यांतून चार गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने याआधी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रविवारी विजयी सुरुवात करून सलामी दिली होती. तिने ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमाथ नाबाचा पराभव केला. पहिला गेम १३ मिनिटांत २९-९ असा जिंकून, दुसरा गेम तिने १४ मिनिटांत २१-६ असा खेळून सामना संपविला होता.

हे ही वाचा..

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीला पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार

अखेर अधीर रंजन चौधरी यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा

राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा !

जपानच्या टोयोटा कंपनीची राज्यात २०,००० कोटींची गुंतवणूक

पी. व्ही. सिंधू हिची कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तिच्याकडून पदकाची अपेक्षा असून तिने पदक मिळवल्यास पदकांची हॅट्रिक करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा