28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषभारताची ‘यशस्वी’ घौडदौड; तिसऱ्या दिवसाअंती ३२२ धावांची आघाडी

भारताची ‘यशस्वी’ घौडदौड; तिसऱ्या दिवसाअंती ३२२ धावांची आघाडी

जैस्वालच्या शतकी आणि शुभमनच्या अर्धशतकी खेळीमुळे भारत सुस्थितीत

Google News Follow

Related

भारतीय युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने जबरदस्त खेळी करत राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. राजकोट कसोटीत यशस्वी जैस्वालने ९ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी करत अवघ्या १२२ चेंडूत शतक झळकावले. यशस्वी जैस्वालचे कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. तो शतकी खेळी केल्यानंतर रिटायर हर्ट झाला. यशस्वीने मैदान सोडल्यानंतर काही षटकानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ५१ षटकानंतर २ बाद १९६ धावा केल्या असून ३२२ धावांची आघाडी घेतली आहे.

इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आतापर्यंत वर्चस्व ठेवले आहे.  इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला होता. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला १२६ धावांची मोठी आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या १९ धावा करून बाद झाला. मात्र, यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल या युवा खेळाडूंनी भारताचा डाव सावरत मोठी खेळी साकरली. यशस्वी जैस्वाल याने तुफान फटके मारत तिसरे कसोटी शतक झळकावले. त्याने शुभमन गिलबरोबर १५५ धावांची भागीदारी साकारली. यानंतर यशस्वी जैस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतला आणि ही भागीदारी तुटली.

शुभमन गिल याने आपले अर्धशतक पूर्ण केले असून सध्या तो नाबाद ६५ धावांवर आहे. दरम्यान, रजत पाटीदार याला मात्र स्वतःचे खातेही उघडता आले नाही. दहा चेंडू खेळून तो शून्यावर बाद झाला. आता कुलदीप यादव फलंदाजीसाठी उतरला असून भारत सुस्थितीत आहे.

हे ही वाचा:

युक्रेनचे अवदिवका शहर रशियाच्या ताब्यात

शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरचा मृत्यू

अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील मंडप कोसळून आठ जण जखमी

सलामीवीर बेन डकेटने इंग्लंडकडून पहिल्या डावात १५३ धावांची शानदार खेळी केली. मात्र, यानंतर उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. जॅक क्रोली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स आणि बेन फोक्ससारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले. भारताकडून मोहम्मद सिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराजने चार फलंदाजांना माघारी धाडले. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी दोन गाडी बाद केले. जसप्रीत बुमराह आणि रवी अश्विनने एक- एक फलंदाजांना बाद केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा