27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषदुसऱ्या कसोटीत अंपायर्स कॉलमुळे भारत पिछाडीवर

दुसऱ्या कसोटीत अंपायर्स कॉलमुळे भारत पिछाडीवर

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या ७ बाद २१८

Google News Follow

Related

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रांची येथे खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या ७ बाद २१८ अशी दयनीय झाली आहे. भारताच्या तीन विकेट्स या अम्पायर कॉलमुळे इंग्लंडला मिळाल्या आहेत. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा यशस्वी जैस्वाल वगळता एकही फलंदाज लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडपेक्षा १३५ धावांनी पिछाडीवर पडला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव नाबाद परतले आहेत. ध्रुव जुरेल २९ धावा करून क्रीजवर आहे. तर कुलदीप यादव १७  धावांवर खेळत आहे. कुलदीप यादव याने ध्रुवला चांगली साथ दिली आहे. कुलदीपने १७ धावा बनवताना तब्बल ७२ चेंडू खेळून काढून प्रतिस्पर्धीना कडवे आव्हान दिले आहे. कुलदीपच्या या संयमी खेळीमुळे भारताची पडझड होऊ शकली नाही.

इंग्लंडच्या फिरकीला अंपायर्स कॉलची मदत
इंग्लंडच्या फिरकीपटूने भारताची दाणादाण उडवली. शोएब बशीरने चार धक्के दिले आणि टॉर्म हार्टलीने २ विकेट्स घेतल्या. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ बॅकफूटवर गेलेला पाहायला मिळतोय. भारताच्या तीन विकेट्स या अम्पायर कॉलमुळे इंग्लंडला मिळाल्या आहेत.

इंग्लंडचा शोएब बशीर आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. भारतीय फलंदाजांना तो कर्दनकाळ ठरला आहे. शोएब बशीरने भारतीय संघातील ४ फलंदाजांना आपले शिकार बनवले आहे. तर टॉम हॉर्टलीने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. जिमी अँडरसनने १ बळी मिळवला आहे.

भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या दोन धावा करून स्वस्तात माघारी परतला. जिमी अँडरसनचा तो शिकार ठरला. त्यामुळे भारताची धावसंख्या १ बाद ४  अशी झाली. यानंतर मात्र यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली भागीदारी रचली. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर नियमित अंतराने भारतीय फलंदाज पॅव्हेलियनकडे परतू लागले.

शोएब बशीर ठरला कर्दनकाळ
शुभमन गिल खेळपट्टीवर आपले रोवतोय असे वाटत असतानाच ३८ धावांवर तो शोएब बशीरचा बळी ठरला. त्यानंतर आलेल्या रजत पाटीदारने पुहा एकदा निराश केले. शोएब बशीरच्या चेंडूवर रजत पाटीदार १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रवींद्र जडेजालाही बशीरने आपले शिकार बनवले. तर आलेल्या सरफराज खानने १४ धावा केल्या आणि टॉम हॉर्टलीने त्याला बाद केले. यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने मात्र एक बाजू भक्कमपणे पकडली. ध्रुव जुरेलला कुलदीप यादवची चांगली साथ मिळाली. ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव यांच्यात आठव्या विकेटसाठी ४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे.

हेही वाचा :

बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागा तृणमूल लढवणार

मंदिरांवरील कराचे विधेयक नामंजूर

श्रेयस अय्यर, ईशान किशनचे बीसीसीआयचे सेंट्रल कंत्राट रद्द?

आरबीआयकडून सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांना पीपीआय जारी करण्याची बँकांना परवानगी

रांची कसोटीत आतापर्यंत काय घडलं?
याआधी इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर आटोपला होता. इंग्लंडकडून जो रूटने शानदार शतक झळकावले. जो रूट १२२ धावा करून नाबाद परतला. ओली रॉबिन्सनने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर भारताकडून रवींद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रवींद्र जडेजाने इंग्लंडच्या ४ फलंदाजांना आपले शिकार बनवले. आकाश दीपला ३ यश मिळाले. मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या. अश्विनने १ विकेट घेतली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा