28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषश्रेयस अय्यर, ईशान किशनचे बीसीसीआयचे सेंट्रल कंत्राट रद्द?

श्रेयस अय्यर, ईशान किशनचे बीसीसीआयचे सेंट्रल कंत्राट रद्द?

Google News Follow

Related

रणजी ट्रॉफीमध्ये न खेळणे श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला भारी पडण्याची चिन्हे आहेत. बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवर कारवाई करून त्यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट बोर्ड लवकरच याबाबतचा निर्णय घेऊ शकते. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने सन २०२३-२४ हंगामासाठी केंद्रीय अनुबंधित खेळाडूंच्या यादीला जवळपास अंतिम रूप दिले आहे. याबाबतची घोषणा बीसीसीआय लवकरच करणार आहे.

किशन आणि अय्यर यांना या यादीतून बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने आदेश देऊनही हे दोघेही घरगुती क्रिकेट खेळलेले नाहीत. डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर किशन काही वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकलेला नाही. तो त्याचा मुंबई इंडियनचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत बडोद्यात सराव करतो आहे. मात्र रणजी ट्रॉफीसाठी झारखंडच्या बाजूने खेळत नाही. तर, अय्यर हा बीकेसीमध्ये आसामविरुद्ध मुंबईच्या अंतिम रणजी ट्रॉफी लीगच्या सामन्यात अनुपस्थित होता. तो शुक्रवारी बडोदाविरोधात रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यातही खेळणार नाही.

श्रेयस अय्यर याने पाठदुखीचे कारण सांगून आपण उपलब्ध नसल्याचे निवडसमितीला सांगितले होते. मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे चिकित्साप्रमुख नितीन पटेल यांनी बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवडसमितीला ईमेल पाठवून अय्यर फिट असल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्या पाठदुखीमुळे काळजी म्हणून गेल्या तीन कसोटी सामन्यांत त्याला भारतीय संघातून बाहेर ठेवावे लागले, अशी माहिती सूत्रांनी दिली. काहींच्या मते, गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्यांमध्ये अय्यरही होता. त्यामुळे केवळ रणजी सामने खेळला नाही म्हणून त्याचे कंत्राट रद्द होणार नाही, असे काहींना वाटते.

हेही वाचा :

बहीण, आईला छळणाऱ्यांना रोखणाऱ्या अल्पवयीन मुलावर गोळीबार

रोहित शर्मा सामन्यादरम्यानच कॅमेरामनवर भडकला

बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागा तृणमूल लढवणार

उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडून भीषण अपघात; १५ भाविक ठार

बीसीसीआयचे मुख्य सचिव जय शाह यांनी गेल्याच आठवड्यात केंद्रीय अनुबंधित आणि भारताच्या ‘अ’ गटातील क्रिकेटपटूंना इशारा दिला होता. रणजी ट्रॉफीमध्ये बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांना मोकळीक दिली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा