33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषउत्तर प्रदेशात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडून भीषण अपघात; १५ भाविक ठार

उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडून भीषण अपघात; १५ भाविक ठार

मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. माघी पौर्णिमेनिमित्त हे भाविक गंगा स्नानासाठी निघालेले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत सात मुलांसह तब्बल १५ भाविकांचा मृत्यू झाला. शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने, ट्रॅक्टर थेट तलावात जाऊन पलटी झाला. त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

माघी पौर्णिमेनिमित्त ट्रॅक्टरमधून सर्व भाविक गंगा स्नानासाठी जात होते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ४० पेक्षा जास्त भाविक बसले होते. ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भाविकांनी भरलेली ट्रॉली थेट तलावात पलटी झाली. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये आठ महिला आणि सात मुलांचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही भाविकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले असून घटनास्थळावरुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

या दुर्घटनेमध्ये अजूनही बचावकार्य सुरु असून तलावाच्या दलदलीत काही भाविक अडकले आहेत का? याचा शोध घेण्यात येत आहे. हा अपघात नेमका कसा झाला? नेमकी चूक कोणाची? दुर्घटनेला जबाबदार कोण? याबाबत चौकशीही करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार जखमींवर शक्य ते सर्व उपचार केले जात आहेत.

हे ही वाचा:

बहीण, आईला छळणाऱ्यांना रोखणाऱ्या अल्पवयीन मुलावर गोळीबार

आसामचे समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल

भारतातून नोकरीसाठी रशियात गेलेल्या तरुणांचा युद्धासाठी वापर!

धक्कादायक! नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला लावली ‘टेप’!

भीषण दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसंच जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारने मदत जाहीर केली असून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा