26 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरविशेषभारतातून नोकरीसाठी रशियात गेलेल्या तरुणांचा युद्धासाठी वापर!

भारतातून नोकरीसाठी रशियात गेलेल्या तरुणांचा युद्धासाठी वापर!

युद्धापासून दूर राहून सावधगिरी बाळगण्याचा तरुणांना भारताचा सल्ला

Google News Follow

Related

रशिया-युक्रेनच्या युद्धात रशिया काही भारतीय नागरिकांचा युद्धासाठी वापर करत असल्याच्या बातम्या समोर येताच भारताने रशियातील आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि या संघर्षापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्हाला माहिती आहे की, काही भारतीय नागरिकांनी रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.त्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावास संबंधित रशियन अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.

नुकताच एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये काही भारतीयांना ‘मदतनीस’ म्हणून कामावर ठेवण्यात आल्याचे अहवालात नमूद केले होता.मात्र आता त्यांना युक्रेनविरुद्ध युद्ध करण्यास भाग पाडले जात आहे, अशी बातमी समोर आली आहे.यातील बहुतांश लोक उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील रहिवासी आहेत.

हे ही वाचा:

धक्कादायक! नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला लावली ‘टेप’!

‘राहुल गांधी यांना भेटण्यासाठी १० किलो वजन कमी करण्यास सांगितले गेले’!

संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!

संदेशखाली वादात शाहजहान शेखवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!

यासह एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मॉस्कोमधील भारतीय दूतावास यांना पात्र लिहून रशियात अडकलेल्या तीन भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. गेल्या २५ दिवसांपासून तीन भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे त्यांचे कुटुंब चिंतेत आहे, असे ओवेसी यांनी आपल्या पत्रात लिहून सरकारकडे मदत मागितली.

दरम्यान, रशियात अडकलेल्या भारतीयाच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला माहिती आहे की काही भारतीय नागरिकांनी रशियन सैन्यात सहाय्यकांच्या नोकरीसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. भारतीय दूतावास त्यांची लवकर सुटका करण्याची विनंती करत आहे. “आम्ही या संदर्भात रशियन अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत. आम्ही सर्व भारतीय नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि रशिया-युक्रेन युद्धापासून दूर राहण्याचे आवाहन करतो, असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा