29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरविशेषभारत-अमेरिका सैन्याचा ‘युद्ध अभ्यास’

भारत-अमेरिका सैन्याचा ‘युद्ध अभ्यास’

ड्रोन, काउंटर-ड्रोन आणि आधुनिक युद्धतंत्राचा सराव

Google News Follow

भारत आणि अमेरिकेच्या सैन्यांमधील संयुक्त लष्करी सराव ‘युद्ध अभ्यास २०२६’च्या २२व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. भारत-अमेरिका संरक्षण सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या सरावात दोन्ही देशांचे सुमारे ६००-६०० सैनिक सहभागी झाले आहेत. उत्तराखंडमधील औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे हा सराव आयोजित करण्यात आला आहे. विविध भौगोलिक आणि युद्धजन्य परिस्थितींमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकत्रितपणे प्रभावी कारवाया करण्याची क्षमता विकसित करणे, हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे.

यंदाच्या सरावात आधुनिक युद्धतंत्र आणि तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे. ड्रोन, काउंटर-ड्रोन प्रणाली, स्वयंचलित यंत्रणा, अचूक हल्ल्याच्या क्षमता आणि बहुआयामी युद्धपद्धतींचा सराव केला जाणार आहे. पर्वतीय भागात प्रतिकूल परिस्थितीत लष्करी कारवाया कशा राबवायच्या, तसेच शत्रूच्या हालचालींवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कशी नजर ठेवायची, याचे प्रशिक्षण सैनिकांना दिले जात आहे. दोन्ही देशांचे जवान आपापल्या युद्धपद्धती, तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींचा अनुभवही एकमेकांसोबत शेअर करणार आहेत.
हे ही वाचा:
स्वतंत्र भारद्वाजला तीन आठवड्यांची अंतरिम जामीन मंजूर

“भारताच्या परराष्ट्र धोरणाला इतर देशांच्या प्रमाणपत्राची गरज नाही”

दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानांना २४ तासांहून अधिक विलंब

सेन्सेक्स ७७८ अंकांनी कोसळला

‘युद्ध अभ्यास’ हा भारत आणि अमेरिकेदरम्यान २००४ पासून आयोजित केला जाणारा नियमित द्विपक्षीय लष्करी सराव आहे. बदलत्या युद्धतंत्राच्या पार्श्वभूमीवर या सरावाचे महत्त्व वाढले असून, संयुक्त युद्धक्षमता, तांत्रिक समन्वय आणि जलद निर्णयक्षमता मजबूत करण्यावर यंदा भर देण्यात आला आहे. या सरावाच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका भविष्यातील आधुनिक युद्धातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या सैन्याची तयारी अधिक भक्कम करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा