30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषभारतीय सैन्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांटची संख्या केली दुप्पट

भारतीय सैन्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांटची संख्या केली दुप्पट

Google News Follow

Related

भारतात कोविडचा प्रभाव वाढलेला असताना भारतीयांच्या मदतीला भारतीय सैन्य देखील धावून आले होते. सैनिकांसोबतच भारतीय नागरिकांना देखील सैनिकी रुग्णालयांनी आपले दरवाजे खुले केले होते. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्यातील कोविडची संख्या देखील कमी होत आहे. त्याशिवाय सैन्याने देखील आपली रुग्णक्षमता वाढवली आहे.

भारतीय सैन्याने विविध आपदांमध्ये नागरिकांचे मोठे सहाय्य केले आहे. भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी यावेळी माहिती दिली की, सैन्याच्या बाबतीतील काळजी घेण्याच्या धोरण म्हणून मागील वर्षी ज्या सुचना सांगितल्या गेल्या होत्या. त्यांचे यावर्षी पुन्हा एकदा पालन केले जाईल. त्याबरोबरच सुरूवातीला झटक्याने एककदम वाढलेल्या कोविड नंतर सैन्यातील कोविड रुग्णांची संख्या देखी घटती आहे असे देखील त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

केरळातील डाव्यांची घराणेशाही उघड

विरोधी पक्षनेत्यांनंतर मुख्यमंत्र्यांना जाग

व्हीव्हीआयपी लस घेतल्याने कुलदीप यादव अडचणीत

एप्रिलच्या सुमारास सैनिकी रुग्णालयांत मिळून सुमारे १,८०० खाटा उपलब्ध होत्या. आता त्यांची संख्या वाढवून ती ४,००० करण्यात आली आहे. त्याबरोबरच भारतीय सैन्याने ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट देखील दुप्पट केले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या प्लांटची संख्या ४२ पर्यंत पोहोचली आहे.

भारतीय सैन्याने अनेक नैसर्गिक आपदांमध्ये नागरिकांची मदत केली आहे. त्याबरोबरच सध्या कोविड लाटेशी चालू असलेल्या लढाईतही भारतीय सैन्य देशवासियांच्या मदतीस उतरले आहे. सैन्याने आपले डॉक्टर्स. वैद्यकीय सुविधा इत्यादी सर्व सामान्य नागरिकांसाठी देखील खुल्या करून देण्याचा निर्णय घेतला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा