29.6 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरविशेषभारतीय वंशाचे अनिल मेनन घेणार अंतराळात ऐतिहासिक झेप

भारतीय वंशाचे अनिल मेनन घेणार अंतराळात ऐतिहासिक झेप

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आठ महिने करणार संशोधन

Google News Follow

भारतीय वंशाचे नासा (NASA) अंतराळवीर अनिल मेनन आता पहिल्यांदाच अंतराळ प्रवासासाठी सज्ज झाले आहेत. १४ जुलै २०२६ रोजी ते रशियाच्या रोस्कोस्मोसच्या सोयूझ एमएस-२९ (Soyuz MS-29) या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना होणार आहेत. सुमारे आठ महिन्यांच्या या मोहिमेदरम्यान ते अंतराळातील विविध वैज्ञानिक प्रयोग, वैद्यकीय संशोधन आणि तंत्रज्ञान चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहेत.

अनिल मेनन यांच्यासाठी ही पहिली अंतराळ मोहीम असून, त्यांच्यासोबत रशियाचे अंतराळवीर प्योत्र दुब्रोव्ह आणि अॅना किकिना हेही सोयूझ एमएस-२९मधून प्रवास करणार आहेत. हे अंतराळयान कझाकस्तानमधील बैकोनूर कोस्मोड्रोम येथून प्रक्षेपित केले जाणार असून, हे तिघे एक्सपेडिशन ७४ आणि ७५ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर कार्यरत राहतील.

कोण आहेत अनिल मेनन?

अनिल मेनन यांचा जन्म अमेरिकेतील मिनियापोलिस येथे झाला. त्यांचे वडील भारतीय वंशाचे, तर आई युक्रेनियन वंशाची आहेत. व्यावसायिकदृष्ट्या ते आपत्कालीन वैद्यकीय तज्ज्ञ (Emergency Physician), एरोस्पेस मेडिसिन विशेषज्ञ आणि अमेरिकन स्पेस फोर्समधील कर्नल आहेत. नासामध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी स्पेसएक्सचे पहिले फ्लाइट सर्जन म्हणूनही काम केले. मानवी अंतराळ मोहिमांमध्ये अंतराळवीरांच्या वैद्यकीय सुरक्षिततेसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अनिल मेनन यांचे भारताशीही घट्ट नाते आहे. रोटरी अॅम्बेसेडोरियल स्कॉलर म्हणून त्यांनी भारतात काही काळ वास्तव्यास राहून पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला होता. तसेच हिमालयातील एव्हरेस्ट परिसरात गिर्यारोहकांना वैद्यकीय सेवा देण्याचे कामही त्यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील वास्तव्यात मेनन विविध वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होतील. त्यामध्ये मानवी शरीरावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम, भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी तसेच अंतराळ स्थानकाच्या पिण्याच्या पाण्यापासून इंट्राव्हेनस (IV) द्रव तयार करण्याच्या नव्या तंत्रज्ञानाची चाचणी यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

युद्धाच्या सावटाखाली बाजार कोसळला; सेन्सेक्स ६४९ अंकांनी खाली

अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले; क्षेपणास्त्र प्रणाली, आयआरजीसीच्या स्पीडबोट्स लक्ष्य

ब्रिटनमध्ये उष्णतेचा कहर; दोन महिन्यांत २,७०० हून अधिक मृत्यू

आषाढी वारीला गालबोट; जेजुरीत ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

अनिल मेनन यांच्या या पहिल्या अंतराळ मोहिमेकडे भारतीय वंशाच्या वैज्ञानिक समुदायाचे विशेष लक्ष लागले आहे. वैद्यकीय क्षेत्र, लष्करी सेवा, अंतराळ वैद्यक आणि मानवी अंतराळ मोहिमांमधील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आता प्रत्यक्ष अंतराळ प्रवासाच्या रूपाने नव्या टप्प्यावर पोहोचत आहे. त्यांच्या या मोहिमेमुळे भारतीय वंशाच्या तरुणांना विज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा