22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
घरविशेषभारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेला मोठे यश, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचं कौतूक!

भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेला मोठे यश, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचं कौतूक!

आदित्य एल१ नियोजित ठिकाणी पोहचलं

Google News Follow

Related

इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.इस्रोने सूर्याच्या अभ्यासासाठी पाठविलेले आदित्य एल१ उपग्रह निश्चितस्थळी पोहचलं आहे. एल१ म्हणजेच लाग्रेंज पॉइंट १ ( एल१ )जवळ हॅलो कक्षेमध्ये आदित्य एल१ आज पोहचलं आहे.यासह भारताने नवीन वर्षात अवकाशाच्या जगात आणखी एक नवीन यश मिळवले आहे.या महत्त्वपूर्ण यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून इस्रोचे अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लिहिले की, भारताने आणखी एक यश संपादन केले आहे.भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य-एल१ त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचली आहे. सर्वात जटिल अंतराळ मोहिमांपैकी एक ही मोहीमत आमच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे मोठे योगदान आहे.” हा अथक समर्पणाचा दाखला आहे. या विलक्षण कामगिरीचे कौतुक करण्यात मी माझ्या देशवासियांसोबत सहभागी आहे. आम्ही मानवतेसाठी विज्ञानाच्या नवीन सीमा पार करत राहू.”

हे ही वाचा:

अयोध्येबाबत म्हणे “अन्यायग्रस्तता” रुजवली?

‘श्री राम आमचे पूर्वज’,काशीच्या मुस्लिम महिला आयोध्येला रवाना!

मामाशी असलेल्या वैमनस्यातून मोहोळचा झाला ‘गेम’

मध्यप्रदेशात बालगृहातून २६ मुली बेपत्ता; धर्मांतर केल्याची भीती!

आदित्य एल१ सूर्याचे रहस्य शोधण्यासाठी त्याच्या अंतिम कक्षेत पोहोचले आहे.हे यान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट (L1) भोवती पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रभामंडल कक्षेत पोहोचले आहे. एल१ बिंदू हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्का आहे. शेवटच्या मुक्कामावर पोहोचल्यानंतर हे यान कोणत्याही प्रकारचे ग्रहण न होता सूर्य पाहू शकणार आहे.

 

आदित्य एल१ चे मुख्य उद्दिष्ट
आदित्य एल१ उपग्रह गेल्या वर्षी २ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आल होतं.सौर वातावरणाची गतिशीलता समजून घेण्यासाठी, सूर्याच्या कोरोनाची उष्णता, सौर भूकंप किंवा सूर्याच्या पृष्ठभागावरील ‘कोरोनल मास इजेक्शन’ (CMEs),सौर वादळांशी संबंधित क्रियाकलाप आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि पृथ्वीच्या जवळच्या अंतराळातील हवामानविषयक समस्या आदी जाणून घेणे हे या आदित्य एल१ उपग्रहाचे उद्दिष्ट आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा