कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बी.आर. पाटील यांचा जवळच्या सहकाऱ्यांसोबत फोनवर बोलतानाचा एक ऑडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते पक्षाच्या अंतर्गत हालचालींबद्दल निराशा व्यक्त करताना ऐकू येतात आणि आरोप करतात की त्यांनीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सोनिया गांधींशी ओळख करून दिली. या फोन कॉलमध्ये पाटील यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला आहे.
“सिद्धरामय्या यांनी लॉटरी जिंकली आणि ते मुख्यमंत्री झाले. मीच त्यांची सोनिया गांधींशी ओळख करून दिली होती. त्यांचे नशीब चांगले होते, म्हणून त्यांना हे पद मिळाले,” असे पाटील हे बोलताना ऐकू येतात. ते म्हणाले, सिद्धरामय्या यांचे ग्रह चांगले होते आणि म्हणूनच ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या स्वतःच्या राजकीय प्रवासात अशा प्रकारचे भाग्य नव्हते.
पाटील पुढे म्हणाले, पहा, आमचा कोणी गॉडफादर नाही. ना आमचा देव आहे ना बाप. पक्षाचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले, त्यांनी माझे म्हणणे गांभीर्याने ऐकले. आता काय होते ते पाहूया. मी जे काही बोललो त्याकडे त्यांनी लक्ष दिले.
हे ही वाचा :
…तर ‘एअर लोरा’ कराची, रावळपिंडी, बहावलपूरला लक्ष्य करू शकते!
नसीरुद्दीन शाह यांचे ‘भारतापेक्षा पाकिस्तानप्रेम मोठं?’
मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची भाषा करणारे मराठीच्या मुद्द्यावर वेगळे झाले होते का?
उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे असतील तर काँग्रेसचा टाटा-बाय बाय?
ते म्हणाले, मी तुमचा आभारी आहे. त्यांनी सांगितले की त्यांना या मुद्द्यांची आधी माहिती नव्हती,” असे ते कॉल दरम्यान म्हणताना ऐकू येत आहेत. त्यांनी हे प्रकरण पक्षाच्या हायकमांड आणि मुख्यमंत्र्यांवर सोपवले आहे, हायकमांड अंतिम निर्णय घेईल असेही बोलताना ते ऐकू आले. दरम्यान, यापूर्वी, पाटील यांचा आणखी एक ऑडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते राजीव गांधी गृहनिर्माण महामंडळातील मोठ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलले होते.
