30 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेषअफगाण खेळाडूंना इरफान पठाणचा खास पाहुणचार!

अफगाण खेळाडूंना इरफान पठाणचा खास पाहुणचार!

आधी अफगाण खेळाडूंसोबत मैदानात डान्स, आता घरी जेवणाला आमंत्रण

Google News Follow

Related

भारतात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा रणसंग्राम सुरू आहे. या स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी पात्र ठरले असून इतर काही संघांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी शर्यत सुरू आहे. दरम्यान, भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात आतापर्यत अफगाणिस्तान संघाने प्रभावी कामगिरी केली आहे.

अफगाणिस्तान संघाने पाकिस्तान आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला आहे. तसेच अफगाणिस्तान संघ त्यांच्या अनपेक्षित खेळामुळे अजूनही सेमीफायनसाठी स्पर्धेत आहे. अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत सात सामन्यात चार विजय मिळवले आहेत. मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर आहे. दरम्यान, अफगाणिस्तान संघासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने पार्टीचे आयोजन केले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

भारतीय खेळाडू आणि अफगाणिस्तान संघातील खेळाडू यांच्यात मैत्री असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. या सर्व अफगाण खेळाडूंमध्ये आणि इरफान पठाण यांच्यामध्येही चांगली मैत्री आहे. त्यामुळेच इरफान पठाण याने अफगाणिस्तान संघासाठी आपल्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. अफगाणिस्तान संघासोबत हरभजन सिंह, अदनान सामी आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनीही या पार्टीला उपस्थिती दर्शवली होती.

अदनान सामी याने एक्सवर (ट्विटर) इरफन पठाण याच्या घरातील पार्टीतील एक फोटो शेअर केला आहे. इरफान पाठण याने अफगाणिस्तान संघासाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या खास पार्टीसाठी सुनील शेट्टी, अदनान सामी, हरभजन सिंह आणि अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ उपस्थित होता. अदनान याने पार्टीतील फोटो पोस्ट करत लिहिले की,  ”इरफान पठान याच्या घरी अफगाणिस्ताच्या संघासोबत शानदार वेळ गेलाय. प्रेम, हसणे, कबाब आणि काबुली पुलाव.”

हे ही वाचा:

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!

जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या लश्करच्या कमांडरचा शिरच्छेद!

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पाठण याची अफगाणिस्तानच्या संघातील खेळाडूंसोबतची मैत्री यापूर्वीही दिसून आली आहे. अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर मैदानात इरफान पठाण याने राशीद खानसोबत डान्स केला होता. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा