31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषइस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीमध्ये बॉम्बवर्षाव!

इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीमध्ये बॉम्बवर्षाव!

डझनभर पॅलिस्टिनी नागरिकांचा मृत्यू

Google News Follow

Related

इस्रायलचा गाझा पट्टीमध्ये हमासविरोधात आक्रमक लढा अद्याप सुरू आहे. बुधवारी युद्धाच्या ८२व्या दिवशी इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्बवर्षाव आणि गोळीबार केला. त्यामध्ये डझनभर पॅलिस्टिनी नागरिक मारले गेल्याचे समजते. खान युनिसमध्ये अल-अमल सिटी रुग्णालयाजवळ इस्रायलच्या हवाईहल्ल्यात २० जणांचा मृत्यू झाला. तसेच, अनेक जण जखमी झाल्याचे गाझामधील आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

इस्रायलच्या लष्कराने खान युनिसमधील अन्य ठिकाणांवरही क्षेपणास्त्र आणि ड्रोनहल्ले केले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गेल्या २४ तासांत किमान २०० ठिकाणी बॉम्बवर्षाव केला, असे इस्रायलच्या संरक्षण दलातर्फे सांगण्यात आले. इस्रायल लष्कराच्या गोळीबारात वेस्ट बँकमधील तुल्कर्म शहरात सहा पॅलिस्टिनी नागरिक मारले गेले. त्यामध्ये युवकांचाही समावेश आहे. तर, इस्रायलच्या लष्कराने दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या बॉम्बवर्षावात तीनजणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा एक सदस्य आणि त्याच्या दोन नातेवाइकांचा समावेश होता.

हे ही वाचा:

डम्परला धडकून बस पेटली; १२ जणांचा होरपळून मृत्यू!

प्रियांका गांधी- वड्रा पती पत्नी ईडीच्या कचाट्यात

इस्रो आता ब्लॅक होलचा अभ्यास करणार

धुक्याच्या विळख्यामुळे उत्तर भारतात शाळांना सुट्टी

मध्य गाझामध्ये दळणवळण सेवा बंद
मध्य गाझावर इस्रायली लष्कराने जमीन, समुद्र आणि हवेतून मारा सुरूच ठेवल्याने बहुतेक ठिकाणी दळणवळण सेवा बंद आहेत. त्यामुळे पॅलिस्टिनी नागरिकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. इस्रायली लष्कराने एक दिवस आधी पूर्व पॅलिस्टिनीमधील गर्दीच्या ठिकाणांवर बॉम्बवर्षाव करण्याचा आणि लोकांना परिसर रिकामे करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर जमिनीवरील हल्ला तीव्र करण्यात आला आहे. मध्य गाझामधील अल-मगाजी भागात झालेल्या हवाई हल्ल्यात पाच पॅलिस्टिनी मारले गेले.

आतापर्यंत २१ हजार ११० पॅलिस्टिनींचा मृत्यू
७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये पुकारलेल्या युद्धात सुमारे २१ हजार ११० पॅलिस्टिनी मारले गेले आहेत. तर, ५५ हजार २४३ जण जखमी झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा