26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरविशेषइस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

Google News Follow

Related

भारतीय अंतराळ संस्थेने म्हणजेच इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचत भारतीयांना दिवाळीनिमत्त मोठी भेट दिली आहे. शनिवार, २२ ऑक्टोबर रोजी १२.०७ मिनिटांनी ISRO LVM-3 चे व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आले आहे. सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले असून ISRO चे रॉकेट LVM-3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे.

इस्रोचे LVM-3 M2/OneWeb India1 हे मिशन पूर्णत: यशस्वी झाले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे १२.०७ मिनिटांनी हे प्रक्षेपण पार पडले. OneWeb च्या ३६ रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी, इस्रो आपले सर्वात वजनदार रॉकेट LVM-3 प्रक्षेपित केले.

LVM-3 पूर्वी या रॉकेटला GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होते. या मिशनसाठी २४ तासांचा काउंटडाऊन ठेवण्यात आला होता. या मिशनमध्ये ब्रिटिश स्टार्टअप OneWeb चे ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. OneWeb ही एक खाजगी उपग्रह संपर्क कंपनी आहे. LVM3 M2 रॉकेट ४३.५ मीटर उंच असून त्याचं वजन ६४४ टन इतकं आहे. हे रॉकेट ८ हजार किलो वजन पेलण्यासही सक्षम आहे. हे उपगृह पृथ्वीच्या जवळच्या म्हणजेच लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये इंजेक्ट केले जाणार आहेत. हे तीन-स्टेज रॉकेट असून यामध्ये दोन सॉलिड मोटर स्टेप्स ऑन आणि एक प्रोपोलेंट स्टेज आहे. मध्यभागी एक क्रायोजेनिक स्टेज आहे. यामुळे त्याला इस्रोचा बाहुबली असेही म्हणतात.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

इस्रोने आतापर्यंत ३४५ आंतरराष्ट्रीय उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात सोडले आहेत. यासाठी मीडियम-लिफ्ट पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलची (PSLV) मदत झाली आहे. २०१७ मध्ये, रॉकेटने मॅपिंगसाठीच्या कार्टोसॅट-२ सॅटेलाइटसह १ हजार ३७८ किलो वजनाचे १०३ परदेशी सॅटेलाइट्स अंतराळात पाठवले आहेत. यातले ९६ सॅटेलाइट्स अमेरिकेचे, तर नेदरलँड, कझाकस्तान स्वित्झर्लंड, इस्रायल आणि यूएईचा प्रत्येकी एक सॅटेलाइट होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा