29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर विशेष २० जुलैला जेफ बेझोस अंतराळात झेप घेणार

२० जुलैला जेफ बेझोस अंतराळात झेप घेणार

Related

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सहभागी उद्योगपती जेफ बेजोस आपली कंपनी ‘ब्लू ओरिजिन’च्या पुढच्या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून प्रवास करणार आहे. इंस्टाग्रामवर सोमवारी जेफ बेजोस म्हणाले की, त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि लिलावातील एक विजेता ब्लू ओरिजिनच्या ‘न्यू शेफर्ड’ स्पेशशिपवर असणार आहेत. २० जुलै रोजी हे अंतराळ यान उड्डाण भरणार आहे. या यानातून टेक्सासमधून अंतराळात थोड्या वेळासाठी प्रवास केला जाणार आहे. तसेच २० जुलै रोजी अपोलो-११ चंद्रावर पोहोचण्याचा वर्धापन दिन देखील साजरा केला जातो.

बेजोस यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की, त्यांना इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि आपली कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ऍमेझॉनचं सीईओ पद सोडण्याची इच्छा आहे.

बेजोस यांनी इंस्टाग्रामवर सांगितलं की, “पृथ्वीला अंतराळातून पाहणं, तुम्हाला बदलून टाकतं. या ग्रहासोबतचं नातं तुमच्यासोबत बदलून टाकतो. मला या उड्डाणातून प्रवास करण्याची इच्छा आहे. कारण ही एक अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या आयुष्यात करायची होती. हे फार रोमांचक असणार आहे. हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.”

हे ही वाचा:

केमिकल कंपनीत काल, तर आज गोडाऊनने पेट घेतला

नव्या कोरोना रुग्णांची संख्या लाखापेक्षा कमी

समन्वय प्रतिष्ठानमार्फत ३००० ठाणेकरांचे लसीकरण

एकीकडे वाफा, दुसरीकडे तोहफा…

न्यू शेफर्ड यानमध्ये सीटसाठी लिलावाची बोली शनिवारी संपली. विजेत्या बोलीची किंमत जवळपास २८ लाख डॉलर आहे. ज्यामध्ये १४३ देशांतील ६००० हून अधिक लोकांचा सहभाग होता. या लिलावाच्या बोलीतून मिळालेली रक्कम ब्लू ओरिजन फाउंडेशनला दान दिलं जाईल. ज्याचा उपयोग भविष्यात अंतराळातील संशोधनासाठी करण्यात येणार आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा