स्टारलिंक इंटरनेट भारतात आणण्यासाठी जिओचा स्पेसएक्सशी करार

देशात स्टारलिंक विकण्यासाठी स्पेसएक्सला आवश्यक मान्यता मिळण्यावर करार अवलंबून

स्टारलिंक इंटरनेट भारतात आणण्यासाठी जिओचा स्पेसएक्सशी करार

रिलायन्स जिओने स्टारलिंकचे सॅटेलाइट इंटरनेट भारतात आणण्यासाठी स्पेसएक्सशी भागीदारी केली आहे. देशात स्टारलिंक विकण्यासाठी स्पेसएक्सला आवश्यक मान्यता मिळण्यावर हा करार अवलंबून आहे. जर तसे झाले तर जिओ त्यांच्या स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे स्टारलिंक सेवा देऊ शकणार आहे. स्टारलिंक कोणत्याही दुर्गम भागात वायर किंवा टॉवरशिवाय इंटरनेट सुविधा पुरवते. यामुळे इंटरनेट थेट सॅटेलाईवरून उपलब्ध आहे. ते एनक्रिप्टेड असून हॅक करणे कठीण आहे.

रिलायन्स जिओचे ग्रुप सीईओ मॅथ्यू ओमेन म्हणाले की, “प्रत्येक भारतीयापर्यंत, ते कुठेही असले तरी, हाय-स्पीड ब्रॉडबँड पोहोचावे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. स्टारलिंक भारतात आणण्यासाठी स्पेसएक्ससोबत भागीदारी करणे हे सर्वांसाठी अखंड कनेक्टिव्हिटीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.” स्टारलिंकला जिओच्या ब्रॉडबँड इकोसिस्टममध्ये सामायिक करून, आम्ही आमची पोहोच वाढवत आहोत आणि या एआय-चालित युगात हाय-स्पीड ब्रॉडबँडची विश्वासार्हता आणि सुलभता वाढवत आहोत, देशभरातील समुदायांना आणि व्यवसायांना सक्षम बनवत आहोत, असेही ओमेन पुढे म्हणाले.

रिलायन्स जिओचे हे पाऊल जिओच्या इंटरनेट पुरवठा व्यापक करण्याच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. स्टारलिंक जिओच्या विद्यमान ब्रॉडबँड लाइनअपमध्ये जिओफायबर आणि जिओएअरफायबरची भर घालेल आणि दुर्गम ठिकाणी जलद आणि परवडणाऱ्या दरात सेवा प्रदान करण्यास मदत करेल. या भागीदारीचा उद्देश संपूर्ण भारतात, विशेषतः दुर्गम भागात ब्रॉडबँड प्रवेश वाढवणे आहे. इतर कोणत्याही ऑपरेटरपेक्षा जास्त मोबाइल डेटा हाताळणारे जिओ, त्यांच्या इंटरनेट सेवा मजबूत करण्यासाठी स्टारलिंकच्या सॅटेलाइट नेटवर्कचा वापर करेल. स्टारलिंक वापरकर्त्यांसाठी स्थापना, सक्रियकरण आणि ग्राहक समर्थनासाठी जिओ एक प्रणाली देखील स्थापित करेल.

एअरटेलने भारतात स्टारलिंक इंटरनेट देण्यासाठी स्पेसएक्ससोबत भागीदारी केल्याचे सांगितल्यानंतर आता जिओकडून ही घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेसमध्ये वाढती स्पर्धा दिसून येते. दोन्ही कंपन्या भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी एकत्र काम करण्याचे इतर मार्ग देखील शोधत आहेत.

हे ही वाचा : 

पाकिस्तानची नाचक्की; सरकारी अधिकाऱ्यालाही अमेरिकेने नाकारला प्रवेश

बांगलादेशात सोन्याचे दुकान लुटून हिंदू सोनाराची हत्या!

डोंबिवलीत आरएसएसच्या शाखेवर दगडांचा मारा, रिझवान शेखसह ५ जण ताब्यात

ईशान्येकडील आणि उर्वरित भारतामधील अंतर कमी केले हेच सरकारचे मोठे यश

स्पेसएक्सचे अध्यक्ष आणि सीओओ ग्वेन शॉटवेल यांनी कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल जिओचे कौतुक केले आणि म्हणाले की, “भारताची कनेक्टिव्हिटी पुढे नेण्याच्या जिओच्या वचनबद्धतेचे आम्ही कौतुक करतो. आम्ही एकत्र काम करण्यास आणि अधिकाधिक लोकांना आणि व्यवसायांना स्टारलिंकच्या हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकारकडून अधिकृतता मिळविण्यास उत्सुक आहोत.”

Exit mobile version