बांगलादेशात अल्पसंख्यांकांना विशेषतः हिंदुंना टार्गेट केले जात आहे. हिंदुंवरील अत्याचाराच्या दररोज बातम्या समोर येत आहेत. आरोपींवर कारवाईची मागणी स्थानिक हिंदूंकडून केली जात आहे. मात्र, युनुस सरकार कट्टरवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीये. याउलट बांगलादेशमध्ये सर्व जातीतील लोक सुरक्षित असल्याचे युनुस सरकार सांगत आहे. अशा घटनांमुळे तेथील हिंदू भयभीत झाला असून न्यायाची मागणी करत आहे. अशातच हिंदुंवर अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. कट्टरवाद्यांनी हल्ला चढवत एका हिंदू तरुणाची हत्या केली आहे.
९ मार्चच्या रात्री बांगलादेशाची राजधानी ढाका मधील आशुलिया पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नायर हाट बाजारात ही घटना घडली. कट्टरवाद्यांनी दिलीप दास यांची निर्घुण हत्या केली. मृत दिलीप दास हे पेशाने सोनार आहेत. चाकू भोसकून त्यांची हत्या करण्यात आली.
हल्लेखोरांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर त्यांच्या सोन्याच्या दुकानातून सर्व दागिने लंपास करत पळ काढला. दिलीप दास यांच्यावरील हल्ला भयानक होता. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. यावरून कट्टरवाद्यांच्या मनात हिंदुंविरोधातील भावना स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेला दोन दिवस उलटले असून पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, युनुस सरकार हातावर हात ठेवून शांत बसण्याची भूमिका बजावत आहे.
हे ही वाचा :
जीएसटी उपायुक्तानेच मागितली होती १५ लाखांची लाच… दोघांविरुद्ध मुंबईत गुन्हा
अमेरिकेला व्यापार शुल्क कमी करण्याबाबत कोणतेही वचन दिलेले नाही
उत्तर प्रदेश: दुचाकीवरून आले इंजेक्शन देऊन पळून गेले, भाजपा नेत्याचा मृत्यू!
बलिया मेडिकल कॉलेजमध्ये मुस्लिम नको, त्यांच्यासाठी वेगळी इमारत बांधा!