28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषमहाराष्ट्रात महायुतीला ४० जागा मिळाल्या तर म्हणे लोक रस्त्यावर उतरतील...

महाराष्ट्रात महायुतीला ४० जागा मिळाल्या तर म्हणे लोक रस्त्यावर उतरतील…

पत्रकार महाविकास आघाडीच्या प्रेमात

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे आणि त्याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. भाजपाप्रणित एनडीए आघाडी जिंकेल की इंडी आघाडीला यश मिळेल याविषयीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्र या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे. तिथे काय होईल याविषयी रोज नवनव्या चर्चा, आडाखे बांधले जात आहेत. महाराष्ट्रात महायुतीविरोधात वातावरण आहे, असा होरा काही पत्रकारांनी मांडायला सुरुवात केली आहे.

अशोक वानखेडे हे दिल्लीतले पत्रकार अजित अंजूम यांच्या चर्चेच्या कार्यक्रमात म्हणाले की,  महायुतीला अधिक जागा महाराष्ट्रात मिळाल्या तर लोक संतापतील. ते रस्त्यावर उतरतील.

अंजूम यांनी विचारलेल्या प्रश्नावर अशोक वानखेडे म्हणाले की, जर महाराष्ट्रातील महायुतीला ४० जागा मिळाल्या तर त्यात कारस्थान असेल. तुम्हीही या निवडणुकीत फिरला आहात, मी महाराष्ट्र, कर्नाटक अनेक राज्ये फिरलो मी लोकांची भावना ओळखतो. अजित पवारांची माणसे म्हणत नाहीत, एकनाथ शिंदेंची माणसे म्हणत नाहीत की आमच्या सीट जिंकणार म्हणून. त्यामुळे महाराष्ट्रात एक अंकी जागा एनडीएला, महायुतीला मिळतील. जर त्यांना ४० जागा मिळाल्या तर महाराष्ट्रात आंदोलन होईल, लोक गप्प बसणार नाहीत.

हे ही वाचा:

‘इस्रायलकडून हमासला नवीन शांतता कराराचा प्रस्ताव’

४ जूनला निकाल; ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून फेअरवेल डिनर

‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण

‘युरोपमधील इस्लामवाद’ कार्यक्रमात कट्टर इस्लामी व्यक्तीने केला चाकुहल्ला

अशोक वानखेडे यांच्याप्रमाणेच अंजूम यांच्याच चॅनेलवर पत्रकार म्हणवणाऱ्या नीलू व्यास यांनीही मोदींना बहुमत मिळाले तर लोक रस्त्यावर उतरतील, न्यायालयात जातील असे मत व्यक्त केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा