देशाची राजधानी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींचा आज शपथ विधी सोहळा पार पडला.पंतप्रधान मोदींच्या शपथ विधीनंतर राज्यातून नवनिर्वाचित निवडून गेलेल्या खासदारांचा शपथ विधी पार पडला.यामध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी शपथ घेतली.रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत.निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.
रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.२०१४ साली त्या पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा खासदार म्हणून त्यांची निवड झाली.आणि २०२४ साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.
हे ही वाचा:
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित
जम्मूच्या ज्वेलर्सने नरेंद्र मोदींसाठी बनवले चांदीचे कमळ!
काँग्रेसची ‘खटाखट योजना’ म्हणजे मतदारांना लाच देणे; ९९ खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी
बेपत्ता इंडोनेशियन महिला मृतावस्थेत आढळली अजगरच्या पोटात!
जळगावच्या राजकारणात नेहमीचा खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. रक्षा खडसेंना आता केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.