28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषपुणे हिट अँड रन प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेला निर्णय धक्कादायक

पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेला निर्णय धक्कादायक

पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन प्रकरणाचा घेतला आढावा

Google News Follow

Related

पुण्यातील हिट ऍण्ड रन प्रकरणानंतर पुण्यासह राज्यभरात जनतेने संताप व्यक्त केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली असून पोलिसांनी संपूर्ण घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण, तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रिमांडचा अर्ज सबमिट केला होता, त्यात अतिशय स्पष्टपणे कलम ३०४ नमूद आहे. स्पष्टपणे लिहिलं आहे की, हा जो मुलगा आहे तो १७ वर्षे ८ महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि १६ वर्षाच्या वरचे जे मुलं असतील त्यांना हेनियस क्राईममध्ये अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. रिमांड ऍप्लिकेशनही आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची कारवाई स्पष्ट केली.

“दुर्देवाने बाल न्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली आणि अडल्ट ट्रीट करण्याचा अर्ज सीन आणि फाईल्ड बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी अतिशय लिनियल्ट व्ह्यू घेत १५ दिवस सोशल सर्व्हिस करा, डिअॅडिक्शन करा, अशाप्रकारच्या गोष्टी लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांकरता एक धक्का होता. कारण पोलिसांनी सर्व पुरावे दिले आहेत. कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे, काय केलं आहे, गाडीचे पुरावे दिले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. याप्रकरणी वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

धोनी मुख्य प्रशिक्षकासाठी स्टीफन फ्लेमिंगचे मन वळविणार?

आधी ‘लेडी सिंघम’ होते, आता भाजपाची एजंट? स्वाती मालीवाल यांचा सवाल

सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ

इंडी आघाडी देशाचे विभाजन करणारी, ते देशाला पुढे काय नेणार?

ज्यांनी अल्पवयीन तरुणाला दारू दिली त्यांच्यावर कारवाई करून अटक केली. त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल केला आहे. शिवाय अटकही करण्यात आली आहे. पोलीस पुढची कारवाई करत आहे. पोलिसांनी प्रकरण गंभीरपणे घेतलं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा