25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरविशेषक्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला 'मिस वर्ल्ड २०२४'चा खिताब!

क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब!

सामाजिक कार्यातही मोठे योगदान

Google News Follow

Related

‘मिस वर्ल्ड २०२४’चा दिमाखदार महाअंतिम सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये पार पडला.तब्बल गेल्या २८ वर्षानंतर भारतात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यापूर्वी १९९६ मध्ये ही स्पर्धा भारतातील बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती.दरम्यान, चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ही यंदाची विश्वसुंदरी ठरली आहे.देशासह परदेशातील अनेक मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते.

चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा हीने ७१ व्या ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब आपल्या नावावर केला आहे.या स्पर्धेत जगभरातील ११७ तरुणींनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत भारताची सिनी शेट्टी देखील सहभागी होती.मात्र, सिनी शेट्टी ही पहिल्या चार मधूनच बाहेर पडली.क्रिस्टिना पिस्कोव्हा ही चेक रिपब्लिकची रहिवासी आहे.ती सध्या २७ वर्षांची असून अतिशय सुंदर आणि हुशार आहे.सामाजिक कार्यातही तिचे योगदान मोठे आहे.

हे ही वाचा:

एवढ्याशा कारणामुळे तिने त्या पुरुषाच्या कानाचा लचका तोडला…

जुनागडमधील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त

भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक

हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी ममतांकडून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी

कोण आहे ‘मिस वर्ल्ड २०२४’ क्रिस्टिना पिस्कोव्हा?
‘मिस वर्ल्ड २०२४’चा किताब आपल्या नावे करणाऱ्या क्रिस्टिना पिस्कोव्हाचा जन्म १९ जानेवारी १९९९ मध्ये झाला आहे. क्रिस्टिना अजूनही वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. अभ्यास करताना मॉडेलिंगमध्ये तिला रुची निर्माण झाली. क्रिस्टिनाची स्वत:ची संस्था आहे. ‘क्रिस्टिना पिस्कोव्हा फाऊंडेशन’ असं या संस्थेचं नाव आहे. टांझानियातील वंचित मुलांसाठी तिने अनेक चांगली कामे केली आहेत. गरीब विद्यार्थ्यांसाठी तिने शाळा सुरू केली आहे. ही शाळा क्रिस्टिना स्वत: चालवते.तसेच तिचे इंस्टाग्रामवर १८१K फॉलोवर्स आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा