लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू असताना जदयूचे नेते, केंद्रीय मंत्री व खासदार राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, गोगोई यांनी भारतीय लष्कराच्या शौर्य, पराक्रम आणि वीरतेचा एकही उल्लेख केला नाही. ललन सिंह म्हणाले, “गोगोई देशभक्तीच्या गोष्टी करत आहेत, ते म्हणाले किती विमाने कोसळली, पण त्यांनी लष्कराच्या पराक्रमावर एक शब्दही काढला नाही. २००४ ते २०१४ या यूपीए सरकारच्या काळात दहशतवाद वाढीस लागला. मीही त्या वेळी खासदार होतो. त्या काळात दहशतवादी हल्ल्यांत ६१५ जणांचा मृत्यू झाला, तर २००६ जण जखमी झाले.”
ते पुढे म्हणाले, “तुम्ही दहशतवादावर बोलता, पण यूपीएच्या काळात मुंबई लोकल बॉम्बस्फोटात २०९ जण ठार झाले, ८०० जखमी झाले. २६/११ ला संपूर्ण मुंबई दहशतवाद्यांच्या ताब्यात होती. तेव्हा काय केलं? २९ विदेशी नागरिक, दोन पोलिस अधिकारी मारले गेले. फक्त अश्रू ढाळलेत, गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला आणि चर्चा संपवली. यूपीए सरकारमध्ये ना धाडस होतं, ना ताकद, फक्त औपचारिकता होती.” ललन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले, “मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जो अमेरिकेत लपून बसला होता, त्याला भारतात आणून खटला चालवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केलं. भारताने प्रथमच २०१६ मध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्याचा ठाम निर्णय घेतला.”
हेही वाचा..
थायलंड आणि कंबोडियाची तात्काळ युद्धबंदीवर सहमती!
साजिद इलेक्ट्रिकवाला अपहरण प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या
“हात मिळवायचा नव्हता… इतिहास घडवायचा होता!”
“मुकाबला ड्रॉ, पण टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड!”
‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात ते म्हणाले, “२४ एप्रिलला पंचायती राज दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मधुबनीत पंचायत प्रतिनिधींना संबोधित करत होते. तेव्हा पहलगाममधील घटनेवर त्यांनी भाष्य केले आणि सांगितले की पाकिस्तानला त्यांच्या कल्पनेपलीकडचा उत्तर मिळेल. हे भाषण इंग्रजीत दिलं, कारण ते जगाला दाखवू इच्छित होते की भारत दहशतवाद्यांपुढे झुकणारा नाही. शेवटी त्यांनी सांगितले, “पाकिस्तानच्या सर्व क्षेपणास्त्रांचा हवेतच नाश झाला, सगळ्या देशाने पाहिलं की ती फटाक्यांप्रमाणे उडाली. कुठलाही नुकसान झाला नाही. कितीही भाषण दिलंत, कोणी ऐकणार नाही – कारण देशाने हे सर्व टीव्हीवर पाहिलं आहे.”







