33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरविशेषबाबासाहेब पुरंदरेंवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बाबासाहेब पुरंदरेंवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Related

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सुचना दिल्या आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना न्युमोनियाने ग्रासले होते. पण उपचारा दरम्यानच त्यांचे निधन झाले. ते १०० वर्षांचे होते.

बाबासाहेब यांचे पार्थिव सध्या पर्वती येथील पुरंदरे वाडा या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी लोटली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे चाहते हे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. तर राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरही बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होत आहेत.

हे ही वाचा:

बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील

कार्तिकी एकादशीला माऊलीची आणि लेकरांची भेट होणार…

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?

बाबासाहेब यांच्या कतृत्वाचा आलेख मोठा असून त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण अशा मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या सर्व बाबी विचारात घेता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर राज्यात शासकीय दुखवटा जाहीर करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा