34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषएसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे याचं निधन !

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे याचं निधन !

सुरवातीपासून ते आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासात ७५ वर्षांचे साक्षीदार लक्ष्मण केवटे होते.

Google News Follow

Related

एसटी महामंडळाची पहिली बस नगर ते पुणे अशी १ जून १९४८ रोजी धावली. या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे काल‌, बुधवारी रात्री नगर शहरातील माळीवाडा भागातील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. मुंबईपासून २७५ किमी अंतरावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माळीवाडा भागातील त्यांच्या राहत्या घरी केवटे यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.एसटी महामंडळाच्या धावलेल्या पहिल्या बसचे वाहक ते गेल्यावर्षी धावलेल्या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटक अशा तब्बल ७५ वर्षांचे साक्षीदार लक्ष्मण केवटे होते.

केवटे यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक श्री.लक्ष्मण शंकर केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. १९४८ साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे श्री.केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे.त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे.

हे ही वाचा:

रणरणत्या उन्हात ५५ वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना तैनात करू नये

नाद एकच; बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील !

‘द केरळ स्टोरी’ बंगालमध्ये प्रदर्शित होणार

भारतात AMAZON करणार अब्जावधी गुंतवणूक

या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या श्री.केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच केवटे कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.लक्ष्मण केवटे हे नगर ते पुणे या बसचे पहिले वाहक होते. ही बस नगर शहरातील माळीवाडा ते पुणे शहरातील शिवाजीनगर अशी धावली. त्यावेळी या बसचे तिकिट २ रुपये ५० पैसे होता. त्यावेळी लक्ष्मण केवटे यांना ८० रुपये पगार होता. नागरिकांनी या बसची पूजा केल्याची आठवणही देऊ त्यांनी सांगितली होती. लक्ष्मण केवटे एसटी महामंडळातून ३० एप्रिल १९८४ रोजी सेवानिवृत्त झाले.

येत्या एक जून रोजी एसटी महामंडळाच्या सेवेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु तत्पूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.एसटीचा चालता बोलता साक्षीदार हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.१ जून १९४८ रोजी एसटी महामंडळाची पहिली बस सकाळी ८ वा. धावली. ३० असनांची क्षमता होती.ही बस बेडफोर्ड कंपनीची बनावट होती.या प्रवासात चास, सुपे, शिरूर, लोणीकंद या ठिकाणी प्रवाशांनी बसला थांबवले व प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. खाजगी बससेवा देणारे महामंडळाच्या बसला विरोध करतील, ही शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या पहिल्या बसला पोलीस बंदोबस्तही देण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा