30.6 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरविशेषजामठ्याजवळ बिबट्याने केला दुचाकीस्वारावर हल्ला

जामठ्याजवळ बिबट्याने केला दुचाकीस्वारावर हल्ला

Google News Follow

Related

नागपूर शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या जामठा येथील स्योरटेक हॉस्पिटलजवळ एक जखमी बिबट्या दिसण्यात आला. वन अधिकाऱ्यांनी त्यास शांत करण्यापूर्वीच त्याने एका वाटसरूला जखमी केले. या प्राण्याला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट केअर सेंटरमध्ये नेण्यात आले आहे.

सकाळी ७:३० ते ८ च्या दरम्यान बिबट्या रुग्णालयाजवळ दिसल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याच्या उपस्थितीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. काही वेळातच गर्दी जमली. या गोंधळात तेथून दुचाकीवरून जात असलेल्या ४० वर्षीय ज्ञानेश्वर ठाकरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. जखमींची प्रकृती गंभीर नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. बिबट्या हॉस्पिटलच्या जागेपासून ५ ते ६ किमी अंतरावर असलेल्या सर्वात झाडीतून आला असावास . हिंगणा पोलीस ठाण्यातून फोन आल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

हे ही वाचा:

रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर गुन्हा दाखल

भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं

सत्तारांचे समर्थन नाही, पण महाराष्ट्रात सिलेक्टिव्हपणा केला जातो

नीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?

घटनास्थळी पोहोचलेले राज्य वन्यजीव मंडळाचे माज सदस्य कुंदन हाते यांनी सांगितले की, “पथक पोहोचेपर्यंत बिबट्या महामार्गाच्या पलीकडे गेला होता. त्याच्या मागच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो जास्त हालचाल करू शकत नव्हता. प्राण्याला शांत करून संक्रमण उपचार केंद्रात नेण्यात आले”. हाते पुढे म्हणाले की हा परिसर वन्य प्राण्यांच्या हालचालीसाठी एक कॉरिडॉर आहे, तसेच खूप दिवस आधीच रूग्णालयाच्या मागील बाजूस ह्या बिबट्याची उपस्थिती असल्याचे दिसून येते. तरीही त्या बिबट्याला सुरक्षितपणे वन विभागाच्या हवाली करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा