27.5 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरविशेषलिओनेल मेस्सीचे धोनीच्या मुलीला खास गिफ्ट

लिओनेल मेस्सीचे धोनीच्या मुलीला खास गिफ्ट

झिवाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही बातमी शेअर

Google News Follow

Related

लिओनेल मेस्सीचे अर्जेंटिनाला आपल्या नेतृत्वाखाली जगज्जेते बनविण्याचे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले आहे. कतारमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव करून तिसऱ्यांदा जेतेपदावर कब्जा केला. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये अर्जेंटिनाने ३६ वर्षानंतर जेतेपद पटकावलं. अर्जेंटिनाच्या या विजयाचा संपूर्ण जगातच नव्हे तर भारतातही जल्लोष करण्यात आला. लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा भारताच्या क्रीडा प्रेमींमध्ये प्रकाशझोतात आला आहे. यावेळी त्याचे कारण ठरले महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा.

मेस्सीने झिवाला त्याची स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली आहे. झिवाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही बातमी शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये झिवाने अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली आहे आणि द ग्रेट लिओनेल मेस्सीने त्यावर स्वाक्षरी केली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे, जसे बाप, तशी बेटी. यावरून मेस्सी हा महेंद्रसिंग धोनीचाही आवडता खेळाडू असल्याचे दिसून येते.

हेही वाचा :

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही

दुचाकी चोरून तो विहिरीत टाकत होता…

तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार

वडिलांप्रमाणेच मुलीलाही आवडणारी गोष्ट अशी कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. झिवाच्या जर्सीवर पॅरा झिवा लिहिलेले स्पष्ट दिसत आहे, ज्याचा अर्थ ‘झिवासाठी’ असा आहे. या फोटोमध्ये झिवा जर्सी घालत त्या जर्सीवरील सही दाखवत आहे.

https://www.instagram.com/p/CmrNmvUIzr2/?utm_source=ig_web_copy_link

भारतामध्ये मेसीचे कोट्यावधी चाहते आहेत. एमएस धोनीसुद्धा फुटबॉलचा चाहता आहे. काही वर्षांपूर्वी धोनीने मेसीसंदर्भात एक ट्वीटही केले होते. सध्या धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसला तरी त्याच्या मुलीच्या नावाने सुरु असलेल्या अकाऊंटवरुन पोस्ट केलेला जर्सीचा फोटो मात्र चर्चेत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा