30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरविशेष'महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल'

‘महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे वक्तव्य

Google News Follow

Related

दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, असे मंत्री अमित शाह म्हणाले आहेत. मुंबईतील दादर येथे आज (१ ऑक्टोबर) पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना मंत्री अमित शाह बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार पक्षाने  कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.

आज मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री शाह म्हणाले, माझ्या अनुभवानुसार काही निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. यासोबतच ते म्हणाले की, ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तीन वेळा सरकार स्थापन करण्याचा विक्रम केला आहे.

हे ही वाचा : 

अशा ‘लाडीक मागण्या’ पवारांसमोरच का होतात?

सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसला आग, २४ जणांचा होरपळून मृत्यू!

तिरुपती लाडू प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत सरकारकडून एसआयटी चौकशीला ‘फुल स्टॉप’

लैंगिक छळवणूक प्रकरणी नायर रुग्णालयातील डीनची बदली!

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. भारतीय जनता पक्ष राज्य करण्यासाठी सत्तेत आलेला नाही, तर आपल्या विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत आहे. महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू, असेही त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसवरही त्यांनी जोरदार टीका केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपले विरोधक एकत्रित आले आहेत. ते कुठलीही तडजोड करायला तयार आहेत. सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्यासोबत आहेत.

ते पुढे म्हणाले,  उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी आणि हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत. आपलेच सरकार येईल, अशी परिस्थिती सध्या आहे. पण अती आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. तसेच अति विश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका, असेही फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा