34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषराज्यात होणार ३०,००० शिक्षकांची मेगा भरती !

राज्यात होणार ३०,००० शिक्षकांची मेगा भरती !

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे,असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

Google News Follow

Related

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असताना रिक्त असलेल्या राज्यातील ३० हजार शिक्षकांच्या जागा जूनपर्यंत भरल्या जातील, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारवर नाराज आहे.आता शिक्षकांमधील नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

राज्यात शिक्षकांची मेगा भरती करण्यात येणार आहे. ही भरती नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली.होणारी शिक्षक भरती दोन टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले. शिक्षक भरती संदर्भात दीपक केसरकर म्हणाले की, “नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे.

पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल. आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल.

हे ही वाचा:

‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांकडे एअर इंडिया, इंडिगोचे लक्ष

भारतातील ४२,००० कुशल कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीच्या संधी

आता परदेशातील प्रेक्षकही बघणार ‘द केरला स्टोरी’

पैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून भीषण अपघात

या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल.”केसरकर म्हणाले, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र, फेब्रुवारी ते मार्च २०२३ मध्ये टेट परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास ३० हजार शिक्षक भरती करणार आहे. शिक्षकांचा पदभरतीसाठी टेट परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणार आहे. सध्या ३० हजारपैकी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी आम्हाला मिळाली आहे. उर्वरित पदेही त्यानंतर भरली जातील.सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत, असा दावा शिक्षक संघटनांकडून केला जातो.आता त्यातील तीस हजार पदे भरण्यात येणार असल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे.

शिक्षकांच्या बदलीबाबत केसरकर म्हणाले…

शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसंच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असं केसरकर यांनी म्हटलं. शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावे लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.

महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण

विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवलं जाईल, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. ऑर्डर दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. स्वतःचे अधिकार वापरुन ज्यांनी आधीच युनिफॉर्म संदर्भात ऑर्डर दिलेली आहेत त्यांनी बैठकीसाठी विचारणा केली आहे. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. स्काऊट गाईड, एनएसएस हे कंपल्सरी करणार आहोत. त्यांना एक पर्टिक्युलर युनिफॉर्म दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही. बूट सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत, असे केसरकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा